Sonia Gandhi, Uddhav Thackeray And Sharad Pawar (Photo Credit: PTI)

महाराष्ट्र (Maharashtra) विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 12 दिवस उलटले तरीदेखील राज्यात सत्ता स्थापन झाली नाही. या निवडणुकीत भाजप- शिवसेना (BJP-ShivSena) महायुतीने अधिक जागा मिळवल्या आहेत. मात्र,  मुख्यमंत्रीपदावरून दोन्ही पक्षात राजकीय वाद सुरु झाला आहे. राज्यात 8 नोव्हेंबर रात्री 12 नंतर राष्ट्रपती राजवट (President Rule) लागू होणार असल्याची शक्यता आहे. भाजप-शिवसेना दोन्हीही पक्ष आपल्या एकमतांवर ठाम असल्याचे दिसत आहे. त्यामुळे यावेळी युतीचे सरकार असेल याची शक्यता कमी आहे. तसेच राज्यात शिवसेना, काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (National Congress Party) हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील अशाही चर्चांना उधाण आले आले आहे. दरम्यान, पक्षाकडे 175 आमदाराचे संख्याबळ असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले होते.

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आमचाच होणार यावरून भाजप- शिवसेना यांच्यात रस्सीखेच सुरु झाली आहे. राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा कायम असतानाच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट 8 नोव्हेंबर रात्री 12 नंतर लागू होणार असल्याची शक्यता आहे. महायुतीतील वाद योग्य कालावधीत संपला नाहीतर, शिवसेना पक्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेसलासोबत घेऊन सत्ता स्थापन करेल, अशी माहिती समोर आली आहे. एकीकडे शिवसेना- राष्ट्रवादीचे सरकार, तर दुसरीकडे काँग्रेसकडे विधानसभेचे अध्यक्षपद आणि बाहेरुन पाठिंबा अशी चर्चांना सुरुवात झाली आहे. शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर यात आणखी भर पडली आहे. हे देखील वाचा- उद्धव ठाकरे घेणार गोपीनाथ गडावर महायुतीचे शिल्पकार गोपिनाथ मुंडे यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन?

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली होती. परंतु या निवडणुकीत भाजपला अधिक जागा मिळाल्या असल्या तरीदेखील राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना शिवसेना पक्षाची गरज भासत आहे. यामुळे शिवसेनाही एक मतावर ठाम असल्याचे दिसत आहे.