रिक्षाच्या दरात पुन्हा होणार वाढ? 'एकतर भाडे वाढवा किंवा CNG वर 40 टक्के सूट द्या', मुंबई रिक्षाचालकांची मागणी
Auto Rickshaw | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात सीएनजीच्या (CNG) दरात वाढ होताना दिसत आहे. आता ऑटोरिक्षा चालक संघटनेने (Autorickshaw Drivers' Union) इंधन दरवाढीची भरपाई करण्यासाठी, कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसवर (Compressed Natural Gas) 40 टक्के सवलत किंवा रिक्षाच्या भाडेवाढीची मागणी केली आहे. सीएनजी सध्या 86 रुपये किलो आहे. मुंबई ऑटोड्रायव्हर्स युनियनचे नेते शशांक शरद राव यांनी मिड-डेच्या हवाल्याने सांगितले की, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून त्यांच्या मागण्या मांडल्या आहेत.

ते म्हणाले की सर्व ड्रायव्हर्सना सीएनजीवर चालणारी वाहने वापरण्याची सक्ती करण्यात आली होती आणि त्यांनी तसे केले. सरकारने खाजगी वाहनांनाही सीएनजी वापरण्याची परवानगी दिली, ज्यामुळे सीएनजीचा युजर बेस वाढला. यामुळे आयातीचे प्रमाण वाढले परिणामी, सीएनजीच्या किमतीत वाढ झाली आहे.

राव यांनी स्पष्ट केले की महानगर गॅस लिमिटेडमध्ये सरकारचे 10 टक्के स्टेक आहेत आणि त्यामुळे त्यांच्या त्यांच्या मागण्या आहेत की, सीएनजी रिक्षाचालकांना स्वस्त दरात उपलब्ध करून त्यांना तो प्राधान्याने वितरित केला जावा, जर ते शक्य नसेल तर त्यांच्या खर्चाचा समतोल साधण्यासाठी त्यांना तात्पुरती भाडेवाढ देण्यात यावी. याबाबत महानगर गॅस लिमिटेड आणि सरकार अशा दोघांना राव यांनी पत्र लिहिले आहे. (हेही वाचा: सर्वसामान्यांना कांदा रडवणार; विक्रेत्यांचे 16 ऑगस्टपासून बेमुदत विक्री बंद आंदोलन, जाणून घ्या मागण्या)

एमजीएलने आठवड्याभरापूर्वी सीएनजीसाठी प्रति किलो 6 रुपये आणि पाइप्ड नैसर्गिक वायूची किंमत तात्काळ प्रभावाने 4 रुपये प्रति युनिट जाहीर केली. शेवटची वाढ 12 जुलै रोजी लागू झाली, जेव्हा सरकारी युटिलिटीने CNG च्या किरकोळ किमतीत 6 रुपये प्रति किलोग्रॅम आणि PNG 3 रुपये/SCM ने वाढवले.