मुंबई शहरातील चर्चगेट रेल्वे स्थानकावर (Churchgate Railway Station) रविवारी वैवाहिक वादातून (Marital disputes) एका 49 वर्षीय पुरुषाला गव्हर्नमेंट रेल्वे पोलिसांनी (GRP) आपल्या 45 वर्षीय परक्या पत्नीवर चाकूने दोन वेळा वार (Knife Attack) केल्याच्या आरोपाखाली अटक (Arrested) केली आहे. घटनास्थळी असलेल्या जीआरपी आणि रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPG) कर्मचार्यांनी रक्तस्राव झालेल्या महिलेला जवळच्या जीटी रुग्णालयात (GT Hospital) नेले ज्यामुळे तिचा जीव वाचला.
पीडित हेमा नाईक प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर ट्रेनची वाट पाहत असताना दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. नाईक पालघर (Palghar) येथील आपल्या घरी परतत असताना अचानक तिचा पती रोशन नाईक, जो व्यवसायाने वेल्डर आहे, तेथे आला आणि तिच्यावर दोनदा वार केले.
तिला जीटी रुग्णालयातून जेजे रुग्णालयात हलवण्यात आले. जेथे तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. ती धोक्याबाहेर आहे आणि आरोपीला मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर करण्यात आले आणि तो पोलिस कोठडीत आहे, असे चर्चगेट जीआरपीचे वरिष्ठ निरीक्षक विजय तायडे यांनी सांगितले. हेही वाचा Bhagirath Biyani Suicide: बीड भाजपचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणींनी संपवलं जीवन, आत्महत्येचे कारण अस्पष्ट
खुनाच्या प्रयत्नाच्या काही तास आधी, पीडिता आणि आरोपी कुलाबा येथे मरण पावलेल्या कुटुंबातील सदस्याच्या विधीसाठी गेले होते. कार्यक्रमादरम्यान, किरकोळ भांडणावरून आणि त्याच्या परक्या पत्नीशी केलेल्या वागणुकीमुळे नाईकला पीडितेच्या मेहुण्याने दोनदा चापट मारली. यातूनच खुनाचा प्रयत्न झाला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे.
या जोडप्याचे दोन दशकांपूर्वी लग्न झाले असून त्यांना दोन मुले आहेत. लग्नानंतर वर्षभरानंतर नाईकने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. त्यांच्या कुटुंबीयांनी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला पण नाईक तिच्यावर शारीरिक अत्याचार करत होते. शेवटी तिने पालघर पोलिसांकडे जाऊन त्याच्याविरुद्ध तक्रार केली आणि सहा महिन्यांपूर्वी आपल्या मुलांसह घरातून बाहेर पडली आणि पालघरमधील दुसऱ्या वस्तीत वेगळी राहू लागली.