
टोकाला गेलेल्या भांडणातून पत्नीने मित्राच्या मदतीने आपल्याच पतीवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना वसई पश्चिम (Vasai West) येथे घडली आहे. मित्राच्या मदतीने पतीवर हल्ला करताना पत्नीने आगोदर पतीचे पाय बांधले. मग त्याच्या अंगावर उकळते तेल टाकले. पत्नी इतक्यावरच थांबली नाही तर, तिने पतीच्या डोळ्यात मरचीपूड फेकून त्याच्या डोक्यावर हातोडीने वारही केले. वसई पश्चिमच्या उमेळमान (Umelman) परिसरातील प्रतापगड या इमारतीत ही घटना घडली. शाजारी आणि परिसरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे पतीचे प्राण वाचले. मात्र, या घटनेत तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मुंबई (Mumbai) येथली जेजे रुग्णालयात (JJ Hospital) उपचार सुरु असल्याचे समजते. पतीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
पतीसोब घडलेले कृत्य आणि त्याची अवस्था पाहून शाजाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी आरोपी पत्नी आणि तिच्या मित्राला घटनास्थळावरुन अटक केली. भविष्य भुऱ्हागोहा असं जखमी पतीचं नाव असून क्विन्सीया भुऱ्हागोहाय असं पत्नीचं नाव आहे. घरातील भांडण टोकाला गेले. या भांडणातून पत्नीने पतीवर हल्ला चढवला. पत्नीने पतीचे पाय रस्सीने बांधून त्याला टॉयलेटमध्ये ठेवलं आणि घरात मिळेल त्या वस्तूने त्याला मारहाण केली. मारहाण असहय्य झालेल्या भविष्यने जीवाच्या अकांताने स्वत:चा बचाव सुरु केला. त्यासाठी त्याने घरातील प्रेशर कुकर आणि स्पीकर हे किचनच्या खिडकीतून बाहेर फेकेल. घरातीस वस्तू खिडकीतून बाहेर पडत असल्याचे पाहून शेजारच्या लोकांनी घरात डोकाऊन पाहिले असता घडटनेचा उलघडा झाला.
दरम्यान, मारहाण सुरु असताना या दाम्पत्याची जुळी मुलेही घरातच होती. त्यांच्यासमोरच हा प्रकार सुरु होता. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळी हजर झालेल्या पोलीसांनी पत्नी क्विन्सीया भुऱ्हागोहाय आणि तिचा मित्र सतवीर नायक याला ताब्यात घेतले. (हेही वाचा, मर्डर मिस्ट्री: नवरा गेला लग्नाला, दुसरीने काढला तिसरीचा काटा; पहिल्या पत्नीच्या मुलीच्या बॉयफ्रेंडचीही मिळाली साथ; चार आरोपींना अटक)
पतीने आरोप केला आहे की, पत्नी क्विन्सीया आणि तिचा प्रियकर सतवीर नायक यांनी हे कृत्य केले. तर, पत्नीने पतीवर आरोप करताना म्हटले आहे की, सतवीर हा माझा नव्हे तर पतीचाच मित्र आहे. मारहाणीची घटना घडताना सतवीर हा घटनास्थळी हजर होता. त्यामुळे पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले आहे. क्विन्सीयाच्या आईवडीलांनी आरोप केला आहे की, भविष्य हा आपल्या मुलीला मारहाण करत असे. (हेही वाचा, लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी पत्नीस लागला पतीच्या अनैतिक संबंधांचा सुगावा; क्रेडीट कार्ड बिल ठरले साक्षीदार)
प्राप्त माहितीनुसार, भविष्य हा मुळचा आसमचा आहे. क्विन्सीया ही ख्रिश्चन धर्मिय आहे. एकमेकांवरच्या प्रेमातून दोघांनी आंतरजातीय विवाह केला होता. भविष्य हा मुंबई येथे एका कॉलसेंटरमध्ये काम करत असे. दोघेही वसई येथील उमेलमान परिसरातील प्रतापगड या सोसायटी येथे भाडेतत्वावर घर घेऊन राहात होते. त्यांना दोन जुळी मुलं आहेत. जी लहान आहेत. या घटनेमुळे हे दोघे राहात असलेल्या सोसाटीत एकच खळबळ उडाली.