Photo Credit- x

मुंबई उद्याचे हवामान- मुंबईत शनिवार (8 जून) रात्री पासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गेल्या काही तासानपासून मुंबईत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे.भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) रविवारी मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतील एका ठिकाणांसाठी नुकताच सावधगिरीचा इशारा जारी केला असून, येत्या 3-4 तासांत विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. येत्या 3-4 तासांत मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतील वेगळ्या ठिकाणी 62-87 किमी प्रतितास वेगाने गडगडाटासह वादळ आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असे IMD ने म्हटले आहे. आता उद्या नेमक वातावरण कसं असेल त्यासाठी हवामान विभागाने सातार शहरात उद्याचे हवामान कस असेल ह्याचा अंदाज लावला आहे.हेही वाचा: Mumbai Rains Prediction: मुंबई शहर व उपनगरात आज ढगाळ हवामान; पहा भरती ओहोटीच्या वेळा

रायगड आणि रत्नागिरी सारख्या शेजारच्या भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता जास्त आहे. सिंधुदुर्ग आणि त्याच्या शेजारील जिल्हा कोल्हापूरसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, बहुतांश भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसावर जोर देण्यात आला आहे,” IMD अधिकाऱ्याने सांगितले.