Mumbai Corona Cases: मुंबईतील कोरोनाची परिस्थिती कशी आहे? येथे पाहा आठवड्याभराची संपूर्ण आकडेवारी
Coronavirus Outbreak (Photo Credits: IANS)

महाराष्ट्रात आलेल्या कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेचा मुंबईकरांना (Mumbai) मोठा फटका बसला आहे. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या पादुर्भावामुळे मुंबईत पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. ज्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यात महानगरपालिकेला मोठे यश आले आहे. दरम्यान, कोरोनाविरुद्ध लढ्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी महत्वाची भुमिका बजावली आहे. वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सफाई कामगार यांच्यासह अनेक लोकांनी आपला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावले आहे. सध्या मुंबईतील कोरोनाची परिस्थिती कशी आहे? हे जाणून घेण्यासाठी आठवड्याभराची आकडेवारी पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मुंबईत सोमवारी (17 मे) 1 हजार 240 रुग्णांची नोंद झाली होती. तर, 48 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मंगळवारी (18 मे) एक हजारांहून कमी रुग्णांची नोंद झाली होती. मुंबईत मगंळवारी 953 रुग्ण आढळले होते. तर, 44 जण दगावले होते. त्यानंतर बुधवारी (19 मे) 1 हजार 350 रुग्ण आणि 57 मृत्यूची नोंद, गुरुवारी (20 मे) 1 हजार 460 रुग्ण आणि 59 मृत्यूची नोंद, शुक्रवारी (21 मे) 1 हजार 416 आणि 54 मृत्यूची नोंद, शनिवारी (22 मे) 1 हजार 299 रुग्ण आणि 52 मृत्युची करण्यात आली आहे. तर, मुंबईत गेल्या 24 तासात (23 मे) 1 हजार 431 रुग्ण आढळले आहेत. तर, 49 जणांना प्राण गमवावे लागले आहे. हे देखील वाचा- Corona Vcccination Update: मुंबईत उद्या 239 केंद्रांवर कोविशील्ड लस देण्यात येणार, महानगरपालिकेची माहिती

बीएमसीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुंबईतील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 6 लाख 97 हजार 810 वर पोहचली आहे. तर, आतापर्यंत एकूण 4 हजार 623 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत आज 1 हजार 470 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच मुंबईतील कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा 6 लाख 52 हजार 686 वर गेला आहे.