मुंबई लोकल ही नागरिकांची प्रवासासाठी लाईफलाईन आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीला पश्चिम रेल्वे (Western Railway) मार्गावर भाईंदर स्टेशन (Bhayandar) वर सकाळी 8.24 ची नॉन एसी लोकल एसी मध्ये बदलण्यात आल्यानंतर प्रवाशांनी आंदोलन केले होते. त्यावर आता उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने सकाळी 8 ची नॉन एसी लोकल ही 12 ऐवजी 15 डब्ब्यांची चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सुमारे 33% प्रवाशांना फायदा होणार आहे.
पश्चिम रेल्वेच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी भाईंदर वरून एसी लोकल चालवली जावी यासाठी प्रवाशांकडून मोठी मागणी होत असताना 8.24 ची नॉन एसी लोकल एसी करण्याचा निर्णय झाला आहे. पश्चिम रेल्वेने 27 नोव्हेंबर पासून एसी लोकलची संख्या वाढवली आहे. त्यासाठी सध्याच्या नॉन एसी लोकल एसी लोकल म्हणून चालवत आहेत. नक्की वाचा: Mumbai Local Train News Update: मुंबईकरांना दिलासा! पश्चिम रेल्वे 27 नोव्हेंबरपासून आणखी 13 एसी ट्रेन सेवा चालवणार, जाणून घ्या सविस्तर .
भाईंदर वरून चर्चगेटला 10 ला सुमारास जाणार्यांना 8.24 ची लोकल महत्त्वाची आहे. प्रवाशांची गरज पाहता आता भरपाई करण्यासाठी आणि गर्दी सामावून घेण्यासाठी, पश्चिम रेल्वेने सकाळी 8.24 च्या आधीच्या एसी लोकलला 15 डब्ब्या मध्ये बदलण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे 33% अधिक प्रवासी प्रवास करू शकतील.
पश्चिम रेल्वेवर आता सकाळी 8 वाजता भाईंदर-चर्चगेट दरम्यान 15 डब्यांची लोकल धावणार आहे. हा बदल 16 डिसेंबर पासून लागू करण्यात आला आहे. हीच ट्रेन 9.09 वाजता चर्चगेट ते नालासोपारा अशी फास्ट ट्रेन म्हणून धावणार आहे.