सांताक्रुझ रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाड; पश्चिम रेल्वेची वाहतूक 10-15 मिनिटे विलंबाने
Western Railway (Photo Credits: File Photo)

पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) सांताक्रुझ (Santacruz) स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे चर्चगेटच्या दिशेने येणाऱ्या सर्व लोकल्स 10-15 मिनिटं उशिराने धावत आहेत. याची माहिती पश्चिम रेल्वेने ट्विट करत दिली आहे. (आज रेल्वेच्या तीन ही मार्गांवर मेगाब्लॉक, जाणून घ्या सविस्तर वेळापत्रक)

पश्चिम रेल्वे ट्विट:

मेगाब्लॉक आणि त्यातच झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना अधिक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. याबद्दल पश्चिम रेल्वेकडून दिलगीरी व्यक्त करण्यात येत आहे.