मध्य रेल्वे (Central Railway), ट्रान्स हार्बर रेल्वे (Trans-Harbour Line) सेवा विस्कळीत झाल्याच्या घटनेनंतर आता पश्चिम रेल्वे (Western Railway) सेवाही विस्कळीत झाली आहे. आज (शनिवार, 22 जून 2019) सकाळी साधारण साडेनऊ वाजनेच्या सुमारास पश्चिम रेल्वे मार्गावर काही तांत्रिक बिघाड झाला आणि मार्गावरील लोकल जागेवरच थांबल्या. बराच काळा या लोकल गाड्या जागेवर थांबल्यामुले प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. एकाच ठिकाणी लोकल थांबल्याने संतप्त प्रवाशांनी गाडीतून खाली उतरत रेल्वेमाग्रावरुन चालत प्रवास करणे पसंत केले.
प्राप्त माहितीनुसार सध्यास्थितीत वाहतूक सुरु झाली असतील तरी, ती अद्याप पूर्णपणे सुस्थितीत आली नाही. या मार्गावरील गाड्या 20 ते 25 मिनिटे उशिरा धावत आहेत. जलद गती मार्गावरील वाहतूकही ठप्प झाल्याचे वृत्त आहे. वसई, विरार, बोरिवली रेल्वे स्टेशनवर प्रामुख्याने प्रवाशांची गर्दीच गर्दी पाहायला मिळत आहे. (हेही वाचा, तांत्रिक बिघाडामुळे हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत)
दरम्यान, मुंबई आणि उपनगरांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गांवरील वाहतूक विस्कळीत होणे हे आता नित्याचेच झाले आहे. गेल्याच आठवड्यात सलग पाच दिवस मध्य रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर हार्बर मार्गावरीलही वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. तर आता ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. सकाळच्या वेळी लोकल विस्कळीत झाल्याने पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.