तांत्रिक बिघाडामुळे हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत
Representational Image (Photo Credits: File Photo)

आज (8 जून) सकाळी हार्बर रेल्वे (Harbor Railway) मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पनवेल हून सीएसएमटी कडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. मात्र पनवेल-ठाणे लोकल सेवा सुरु आहे.

सकाळी कामाला जाण्याच्या वेळेस झालेल्या रेल्वे मार्गावरील तांत्रिक बिघाडामुळे चाकरमान्यांसह प्रवाशांचेही चांगलेच हाल होत आहेत. गेल्या अर्ध्या तासापासून खोळंबलेली वाहतूक कधी सुरु होणार, याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही. या सर्व प्रकारामुळे प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत.

काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वे मार्गावर ओव्हर हेट वायर तुटल्यामुळे आणि रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वे वाहतूकीचा खोळंबा झाला होता.