पश्चिम महाराष्ट्राला मुसळधार पावसाने गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून जोरदार पावसाची बॅटिंग सुरू आहे. हवामान विभागाकडून सातारा जिल्ह्यासाठी आज आणि उद्या असे दोन दिवस रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यानंतर पुढील दोन दिवसांसाठी सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आहे. जिल्ह्यातील नद्यांच्या आणि धरणांच्या पाणी पातळीमध्ये वेगाने वाढ झाल्याने रस्ते वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला आहे. (हेही वाचा - Kolhapur Rain: कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, शिवाजी विद्यापीठाच्या परिक्षा रद्द) #Maharashtradin #
कोल्हापूर जिल्ह्यासाठी आज आणि उद्या असे दोन दिवस ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यानंतर 24 आणि 25 जुलै रोजी सुद्धा येलो अलर्ट देण्यात आला असून 26 जुलै रोजी ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातही जोरदार पाऊस होत आहे. यामुळे कोयना धरणातील पाणीसाठ्याने 51 टीएमसीचा टप्पा गाठला आहे. अजून धरण पूर्ण भरण्यासाठी 54 टीएमसी पाण्याची गरज आहे.
दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात काल पासून मुसळधार पाऊस सुरु आहे. आजही देखील संपुर्ण जिल्ह्यात पावासाची बॅटींग सुरु आहे. जिल्ह्यातले 85 बंधारे पाण्याखाली गेले असून कोल्हापूर- गगनबावडा सह एकूण 33 मार्ग बंद करण्यात आले आहे. जिल्ह्यात पावसाचे रौद्ररुप पाहून आज शिवाजी विद्यापीठाच्या परिक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. राधानगरी धरणात 80 टक्के पाणी भरले तर वारणा 72 टक्के पाणी भरले आहे.