वेब मीडिया असोसिएशन मुंबई च्या कायदेशीर सल्लागार (Legal advisor) पदी क्रिमिनोलॉजिटस (Criminologist ) स्नेहील ढाल (Snehil Dhall) यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान वेब मीडिया असोसिएशनच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयात झालेल्या बैठकीत वेब मीडिया असोसिएशनच्या कायदेशीर बाबींवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर वेब मीडिया असोसिएशन कडे देशातील व परदेशातील एखादा विषय किंवा मुद्दा उपस्थित झाल्यास यावर मार्गदर्शन व पत्रव्यवहार करण्यासाठी मुंबई येथील उच्चशिक्षित क्रिमिनोलॉजिटस(Criminologist ) स्नेहील ढाल यांची कायदेशीर सल्लागार पदी नियुक्तीसाठी एकमताने ठराव मंजुर करण्यात आला आहे.
स्नेहील ढाल क्रिमिनोलॉजिटस (Criminologist ) तज्ञ आहेत. युके येथे यांनी शिक्षण घेऊन क्रिमिनोलॉजीचीCriminologist) डिग्री संपन्न केली आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवर अनेक शासकीय संस्था व संस्थेमधील उच्चस्तरीय IAS, IPS अधिकाऱ्यांना व दहशदवादी विरोधी पथक मधील अधिकाऱ्यांना ते मार्गदर्शन व ट्रेनिंग देत आहेत. राष्ट्रीय सुरक्षा संबंधी विषय असल्यास शासकीय स. डिफेन्स, शहरी भागातील पोलीस अधीकारी, कर्मचारी,राज्य पोलिस दल,सेंट्रल पोलीस दल या सर्व प्रकारच्या अधिकारी वर्गाला स्नेहील ढाल यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
वेब न्यूज पोर्टल, वेब सिरीज, सोशल मीडिया कंपनी,भारतात किंवा भारताच्या बाहेर चालवणार्या सर्व व्यवस्थापकांना किंवा वेबसिरीज कंपन्या बाबत कुठल्याही काही अडचणी येत असेल तर वेब मीडिया असोसिएशन च्या माध्यमातून सर्व संस्थांना कायदेशीर न्याय व मार्गदर्शन मिळवून दिले जाईल तसेच वेब न्यूज पोर्टल च्या वरिष्ठ पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना कायदेशीर मदत करण्यात येईल. वेबमीडिया मध्ये काम करणाऱ्या सर्व लोकांना मदत करण्यात येईल व स्नेहील ढाल यांच्या बुद्धिमत्तेचा योग्य रीतीने समाज उपयोगी कामासाठी यांचा उपयोग केला जाईल असे यावेळी वेळी वेब मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष अनिल महाजन व स्नेहिल ढाल यांनी पत्रकारांना बोलतांना सांगितले.