(File Photo)

राज्यातील सर्व बेब न्यूज पार्टल, चालक मालक, संचालक आणि जिल्हा, तालुका आणि शहर पातळीवर पोर्टलसाठी काम करणाऱ्या पत्रकार बांधवांची एक बैठक संघटीत वेब मीडिया असोशिएशन (Web Media Association) द्वारे आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक मुंबई येथे 18 मार्च रोजी पार पडणार आहे. संघटीत वेब मीडिया असोशिएशन अध्यक्ष, गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक अनिल महाजन (Anil Mahajan) यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे. डिजिटल इंडिया मध्ये वेब मीडिया म्हणजे हा नवीन प्रवाह आला आहे. त्यावर विचार विनिमय करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात आज तालुका आणि जिल्हा पातळीवर सुमारे 15 ते 20 हजार वेब पोर्टल कार्यरत आहेत. मात्र, या पोर्टल्सबाबत केंद्र अथवा राज्य सरकारने कोणतेही धोरण निश्चित केलेले नाही. केंद्र सरकारचे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडूनही वेब मीडियासाठी कोणत्याही प्रकारचे धोरण निश्चित झाले नाही. त्यामुळे वेब मीडियासाठी केंद्र सरकारने लवकरात लवकर धोरण निश्चित करावे यासाठी संघटीत वेब मीडिया असोशिएशन स्थापन करण्यात आली आहे.

दरम्यान, संघटीत वेब मीडिया असोशिएशनच्या माध्यमातून केंद्री माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. ज्यामुळे वेब पोर्टल्सनाही धोरन निश्चित होईल आणि वेब पोर्टल्सनाही RNI क्रमांक मिळू शकेल याबाबत पावले टाकली जातील.