Weather Update Tomorrow: भारतीय हवामानशास्त्र विभागाने 19 जुलैरोजी मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. IMD ने रायगडसाठी रेड अलर्ट तर उद्या मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातार आणि कोल्हापूरसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत असून, विविध शहरांमध्ये पूर आणि वाहतूक कोंडी झाली आहे. आयएमडीने सांगितले की, मान्सून खाली सरकण्यास सुरुवात झाली आहे आणि कर्नाटक, केरळ आणि कोकण गोव्याच्या किनारपट्टीवर येत्या काही दिवसांत 20 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडेल.

 कसे असेल देशातील उद्याचे हवामान?

"कर्नाटक, केरळ आणि कोकण गोव्याच्या किनारपट्टीवर आम्ही येत्या काही दिवसांसाठी रेड अलर्ट जारी करत आहोत. तेथे २० सेमीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो. दिल्ली-एनसीआरमध्ये येत्या काळात हलका पाऊस पडेल. दिवस दिल्लीसाठी कोणताही इशारा नाही, " भारतातील अनेक राज्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे पूरस्थिती आणि जीवित व मालमत्तेची हानी झाली आहे.

 कसे असेल राज्यातील उद्याचे हवामान?

महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह, ठाण्यातील भिवंडी परिसरातील कामवारी नदी रविवारी दुथडी भरून वाहत होती, त्यामुळे काठावर राहणाऱ्या लोकांच्या घरात पाणी शिरले. भिवंडीतील कामवारी नदीलगतच्या सुल्तानिया गली झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांच्या घरात गुडघाभर पाणी साचले असून, नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने अनेक लोक घराबाहेर पडले आहेत. दरम्यान, केरळमधील अनेक जिल्हे सोमवारी रेड अलर्टवर आहेत. IMD ने केरळमधील मलप्पुरम, कन्नूर आणि कासारगोड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे आणि एर्नाकुलम, थ्रिसूर, पलक्कड, कोझिकोड आणि वायनाड जिल्ह्यांसाठी सोमवारी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.