Maharashtra Weather | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

महाराष्ट्रात (Maharashtra) आज अनेक ठिकाणी ढगाळ वातावारण पाहायला मिळत आहे. अचानक ढगाळ वातावरण दिसू लागल्याने अनेकांना अश्चर्य वाटते आहे. शेतकरीही काहीसे चिंतेत आहेत. राज्यातील हे वातावरण पुढचे दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने (Meteorological Department) असाच अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वातावरण ढगाळ राहील. तसेच, काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याचीही शक्यता आहे. दरम्यान, काही पावसाच्या तूरळक सरीही कोसळल्या आहेत. पुर्वेकडून मध्य भारतात येणाऱ्या वाऱ्यामुळे महाराष्ट्र, राजस्थान आणि गुजरातमध्ये वातावरणात मोठा बदल पाहायला मिळेल. या काळात महाराष्ट्रात ताशी 40 कि.मी वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गुरुवारी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. तर जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुके पावसाने चिंब झाले. हवामान विभागाने म्हटले आहे की, राज्यातील काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, Maharashtra Weather Update: मराठवाड्यातील 'या' जिल्ह्यांमध्ये पुढील 4 दिवसात हलक्या स्वरुपाच्या पावसासह वादळी वारे वाहण्याची शक्यता)

मुंबईतही पुढचे दोन दिवस वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरीही कोसळू शकतात. कोकणातही अशीच स्थिती राहणार असून, त्याचा फटका आंबा पिकांना बसू शकतो, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

मुंबई आणि कोकणात पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे, तसेच काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पावसामुळे कोकणातील हापूस आंब्याला मोठा फटका बसू शकतो.