महाराष्ट्रात दाखल झाल्यापासून काहीसा गायब झालेला मान्सून (Monsoon Rain Update) पुन्हा सक्रीय झाला आहे. परिणामी राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy Rain) बरसत आहे. हवामान विभागानेही पुढचे चार ते पाच दिवस महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. राज्यात मुसळधार पावसाची (Rain Update) शक्यता आहे. खास करुन कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात आगामी दोन ते दीव दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. कालपासून मुंबई शहर, उपनगरे, ठाणे आणि रायगड जिल्ह्यसह रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातही दमदार पावसाने हजेरी लावली आहे.
पावसाने राज्यात दमदार हजेरी लावल्याने नदी, नाल्यांना पूर आला आहे. परिणामी राज्यातील काही जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने म्हटले आहे की, मराठवाडा आणि विदर्भात मध्यम ते मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. हवामानातील स्थित्यांतरण लक्षात घेता शहरातील चाकरमाणी आणि ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर यांनी आवश्यक काळजी घ्यावी असे अवाहन करण्यात आले आहे. (हेही वाचा, Maharashtra Rain Update: कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यात अनेक ठिकाणी दमदार पावसाची शक्यता)
ट्विट
7 July: सक्रिय मान्सून राज्यात ...
राज्यात पुढचे 4,5 दिवस मुसळधार-अति मुसळधार पाऊस शक्यता.
कोकण,मध्य महाराष्ट्र काही भागात अतिवृष्टी शक्यता पहिले 2,3 दिवस.
मराठवाडा मध्यम ते जोरदार, विदर्भात हि
- IMD
Watch for IMD Updates please daily. pic.twitter.com/vs2qb2pSuT
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 7, 2022
राज्यात मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 65 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. पुराचा किंवा दरड कोसळण्याचा फटका बसू नये यासाठी आतापर्यंत सुमारे 4,500 नागरिकांना सुरक्षीत ठिकाणी हालविण्यात आले आहे. पाठिमागील वर्षाचा अनुभव लक्षात घेता रायगड जिल्ह्यात एनडीआरएफची टीम तातडीने दाखल झाली आहे. महाड परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे. पाठिमागील वर्षीही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर महापूर आला होता. कोकणात पुढचे चार-पाच दिवस अधिक महत्त्वाचे असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, कोकणात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.