महाराष्ट्र: Lockdown चा फटका बसलेल्या लघु आणि मध्यम उद्योगांना सरकारकडून काही सवलती देण्यासाठी प्रयत्न करणार- सुभाष देसाई
Subhash Desai (Photo Credit: Facebook)

लॉकडाऊनचा (Lockdown) फटका जगभरातील अनेक उद्योगक्षेत्रांना बसला. त्यामुळे त्याचा परिणाम उद्योग करणा-या कामगार, मजूरांवरही झाला. पाच महिने सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे लघु आणि मध्यम उद्योगांचे (MSME) तर प्रचंड हाल आणि आर्थिक नुकसान झाले. यामुळे अशा उद्योगांना काही सवलती तसेच काही पॅकेज देण्यात यावे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

लॉकडाऊन राज्याला मोठा आर्थिक फटका बसला असून यात पिळवटून निघालेल्या लघु आणि मध्यम उद्योगक्षेत्रांना मदत म्हणून वीजदर आणि मजूरांना वेतन देण्याबाबत सरकारकडून काही पॅकेज जाहीर करण्यात यावे तसेच काही सवलती देण्यात याव्या यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत अशी माहिती सुभाष देसाई यांनी TOI शी बोलताना दिली. RBI ने 20,000 कोटींच्या OMO ची केली घोषणा; दोन टप्प्यांत होणार Government Securities ची खरेदी-विक्री

महाराष्ट्रात 20 लाख लघु आणि मध्यम उद्योगांची नोंदणी आहे. त्यातील 6 लाख उद्योग हे उत्पादन क्षेत्रात तर अन्य सेवा क्षेत्रात येतात. त्यामुळ या उद्योगांना पुन्हा नव्याने सुरुवात करण्यासाठी आणि लॉकडाऊन दरम्यान झालेले नुकसान भरून काढण्यासाठी सरकारकडून काही मदत मिळावी यादृष्टीने प्रयत्न चालू असल्याचे मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय मांडल्यावरच विशेष पॅकेजची घोषणा करण्यात येईल असेही ते म्हणाले.