रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (RBI) कडून 20 हजार कोटींच्या गर्व्हर्मेंट सिक्युरिटींचे Open Market Operations मध्ये विक्री होणार असल्याची घोषणा आज (25 ऑगस्ट) करण्यात आली आहे. दरम्यान हा व्यवहार 2 टप्प्यांमध्ये होणार आहे. सध्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेता आरबीआय कडून प्रत्येकी 10 हजार कोटीच्या गर्व्हर्मेंट सिक्युरिटींचे OMO द्वारा व्यवहार केले जाणार आहेत. यासाठी बोली 27 ऑगस्ट आणि 3 सप्टेंबर 2020 दिवशी लावली जाणार आहे. तर त्याचे निकाल देखील तेव्हाच जाहीर केले जातील.
दरम्यान पात्र सहभागी व्यक्तींना त्यांची बोली RBI Core Banking Solution (E-Kuber) द्वारा इलेक्ट्रॉनिक फॉर्मेट मध्ये सादर करायची आहे. त्यासाठी सकाळी 10 ते 11 ही तासाभराची वेळ देण्यात आली आहे.
RBI Tweet
RBI Announces Special Open Market Operations (OMOs) of Simultaneous Purchase and Sale of Government of India Securitieshttps://t.co/qQKY9fEuEB
— ReserveBankOfIndia (@RBI) August 25, 2020
यशस्वी सहभागी व्यक्तींना त्यांचे फंड आणि सिक्युरिटी करंट अकाऊंटमध्ये किंवा SGL account मध्ये 28 ऑगस्टच्या दुपारी 12 वाजेपर्यंत दाखवणं गरजेचे आहे. तर 3 सप्टेंबरच्या बोलीसाठी वेगळं वेळापत्रक आरबीआयकडून जाहीर केलं जाणार आहे.
डिसेंबर 2019 मध्ये अशाप्रकारे पहिल्यांदा open market operations द्वारा सरकारी सिक्युरिटीजची खरेदी-विक्री करण्यात आली होती. त्यानंतर जून आणि जुलै 2020 मध्ये देखील प्रत्येकी 10 हजार कोटींच्या सरकारी सिक्युरिटीजचे व्यवहार झाले होते.