Manoj-Jarange-Patil | Twitter

मराठा आरक्षणाच्या (Maratha Aarakshan) मागणीसाठी पायी निघालेले मनोज जरांगे (Manoj Jarange Patil)  पुण्यामध्ये  (Pune) दाखल झाले आहेत. आज आंदोलनाच्या चौथ्या दिवशी मनोज जरांगे पाटील आपल्या मुंबई मध्ये आंदोलनावर ठाम आहेत. 26 जानेवारीला ते मुंबई मध्ये दाखल होणार असून आझाद मैदान किंवा शिवाजी पार्क वर आपल्याला आंदोलनाला जागा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. जालना, बीड आणि अहमदनगर असे जिल्हे ओलांडून ते पुण्यामध्ये दाखल झाले आहे.

काल 22 जानेवारीला मनोज जरांगे पाटील यांचा मुक्काम रांजणगाव येथे होता. आज सकाळी त्यांनी रांजणगावातून मुंबईकडे आपला प्रवास सुरू केला आहे. आजचा त्यांचा मुक्काम पुण्यातील चंदननगर मध्ये आहे. Manoj Jarange Patil On CM Eknath Shinde: अधिकारी 'मराठा-कुणबी' नोंदीसाठी रेकॉर्डच देत नाहीत, मनोज जरांगे पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार. 

पहा मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया

26 जानेवारीला मुंबईतील गल्ली-गल्लीत मराठे पाहायला मिळतील असं मनोज जरांगे म्हणाले आहेत. 25 जानेवारीनंतर मुंबईत येणाऱ्या मराठा आंदोलकांची संख्या वाढण्याची शक्यता असून, 26 जानेवारीला मुंबईत मोठी गर्दी होण्याची देखील शक्यता आहे. सध्या या सर्व पार्श्वभूमीवर पोलीस लक्ष ठेवून आहेत. 'आतापर्यंत सरकारला सात महिन्याचा वेळ दिला, यापुढे आता एक तास ही मिळणार नाही. आणि आम्ही मुंबईत आंदोलन करणारच' असा इशारा मनोज जरांगे पाटील यांच्याकडून थेट सरकारला देण्यात आल्याने त्यांच्यासमोर देखील या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आता तयारी सुरू आहे.

दरम्यान आजपासून राज्य मराठा सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. बीएमसी अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून हे काम केले जाणार आहे. 31 जानेवारी पर्यंत घरोघरी जाऊन पालिका कर्मचारी राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार निर्धारित केलेले प्रश्न नागरिकांना विचारणार आहेत.