Mumbai Rains: मुंबईत मुसळधार पावसामुळे वडाळा स्थानकात पाणी साचले(Waterlogged at Wadala Station) आहे. वडाळा स्थानकात रेल्वे रुळांवर पाणी आहे. त्यामुळे लोकलसेवा उशीराने सुरू आहे. तर दुसरीकडे हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा काही मिनिटे उशिराने सुरू (Harbor Railway)आहे. काल झालेल्या पावसाचा मुंबईकरांना चांगलाच फटका बसला आहे. आज देखील शहरात पावसाचा अलर्ट हवामान विभागाने (Mumbai Weather Forecast)दिला आहे. भारतीय हवामान विभागाने आज जुलै रोजी ऑरेंज अर्लट जारी केला आहे. अतिवृष्टीची शक्यता असल्याने कमाल तापमान 28 डिग्री सेल्सियस असणार. (हेही वाचा: Mumbai Weather Forecast Today: मुसळधार पावसामुळे मुंबई शहरात आज ऑरेंज अर्लट, वाचा आजचा हवामान अंदाज)
पोस्ट पहा
#WATCH | Maharashtra: Waterlogged witnessed at Wadala Station of Mumbai amid heavy rains in the city.
Harbor line services are running a few minutes late. pic.twitter.com/f6UsjqsPoE
— ANI (@ANI) July 9, 2024
मुंबई शहरात आणि उपनगरात मुसळधार पाऊस पडत आहे. भारतीय हवामान विभागाने आज ऑरेंज अर्लट जारी केला आहे. अतिवृष्टीची शक्यता असल्याने कमाल तापमान 28 डिग्री सेल्सियस तर किमान तापमान 24 डिग्री सेल्सियस असेल. 8 जुलै रोजी मुंबईत 300 मिमी इतका पाऊस पडला. याच पार्श्वभूमीवर ऑरेंज अर्लट देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे मार्ग आणि वाहतुक सेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे प्रवाशांचे गंभीर हाल झाले होते. तुमच्या दिवसाचे नियोजन करण्यासाठी लाईव्ह अपडेट पाहा.