Water Cut In Mumbai: मुंबईत सलग दोन दिवस पाणीकपात, 17 मे रोजीच करुन ठेवा पुरेसा साठा
Water Cut | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

मुंबई (Mumbai) शहरात येत्या 18 व 19 मे रोजी पाणी कपात (Water Cut In Mumbai) केली जाणार आहे. त्यामुळे सलग दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. महापालिकेने याबाबत काही दिवस आगोदरच नागरिकांना माहिती दिली आहे. त्यामुळे 17 मे रोजीच नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करुन ठेवावा लागणार आहे. पाणीतुटवड्याला सामारे जावे लागू नये यासाठी पाण्याचा पुरेसा साठा आगोदरच करुन ठेवावा. पाणीकपातीच्या काळात नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे. पाण्याचा अपव्यय टाळावा. प्रशासनाला सहकार्य करावे, अशाही सूचना प्रशासनाने नागरिकांना केल्या आहेत.

कोणत्या भागात पाणीकपात?

  • कुर्ला
  • चेंबूर
  • घाटकोपर
  • सायन
  • किंग्ज सर्कल
  • माटुंगा
  • परेल

(हेही वाचा, Summer Tips: उन्हाळ्यात गरम पाणी पिण्याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या)

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सलग दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी पाणीकपात केली जाणार असल्याचेही प्रशासनाने म्हटले आहे.