Pune Water Cuts: पुणेकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी पुण्यात 'या' भागात पाणीकपात जाहीर
Water Cut | Representational & Edited Image (Photo Credits: Pixabay)

Pune Water Cuts: पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पुणे महानगरपालिकेच्या (PMC) पाणीपुरवठा विभागाने चिखली आणि चतुश्रृंगी येथील ओव्हरहेड टाक्यांच्या कामामुळे गुरुवारी आणि शुक्रवारी शहरांच्या काही भागांसाठी पाणीकपात जाहीर केली आहे. विभाग चिखली स्थानकात फ्लो मीटर बसवणार आहे. तथापी, पर्वती ते एसएनडीटी दरम्यानच्या 1200 मिमीच्या सध्याच्या पाइपलाइनमधून गळतीचा प्रश्न सोडवला जाणार असून मुख्य पाइपलाइनला नगर रस्त्यावरील पाण्याची पाइपलाइन जोडली जाईल. दरम्यान, शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाईल. ज्या भागात पाणीकपात होणार आहे, त्यात खालील क्षेत्रांचा समावेश आहे.

चतुरश्रुंगी जलशुद्धीकरण केंद्र -

औंध, बोपोडी, औंध रोड, खडकीचा काही भाग (पुणे मुंबई हायवे), अभिमानश्री सोसायटी, विधाते वस्ती, I. T. I रोड, पंचवटी, कस्तुरबा कॉलनी, सिद्धार्थ नगर, औंध गाव, पुणे विद्यापीठ परिसर, भाऊ पाटील रोड, बाणेर रोड परिसर, भोईटे वस्ती, सिंध सोसायटी, सानेवाडी, आनंद पार्क, नगरस रोड, I.C.S. कॉलनी भोसले नगर, इंदिरा कॉलनी, सकाळ नगर, अंगल पार्क आणि राजभवनमध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद असणार आहे. (हेही वाचा - Unseasonal Rain Update: राज्यभर अवकाळी पाऊस; मुंबई, ठाणे, सातारा सांगलीसह बुलढाणा, परभणी जिल्ह्यातही 'सरीवर सरी')

चिखली जलशुद्धीकरण केंद्र -

गणेश नगर बोपखेल, म्हस्के वस्ती आळंदी रोड, टिंगरेनगर, आदर्श कॉलनी, बारमाशील झोपडपट्टी, पुणे विमानतळ लोहगाव, राजीव गांधी नगर (उत्तर व दक्षिण), विमाननगर, यमुनानगर, श्रीपार्क सोसायटी, पराशर सोसायटी, दिनकर पठारे वस्ती, ठुबे पठारे नगर, आणि खारडी बायपास रोड याठिकाणी गुरुवारी पाणीपुरवठा बंध असेल. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि पाणीकपातीला सामोरे जाण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था करावी, असे आवाहन पुणे महापालिकेने केले आहे.