Ulhasnagar Firing Video: कल्याणमधील भाजप आमदार गणपत गायकवाड (BJP MLA Ganpat Gaikwad) यांनी शुक्रवारी रात्री उल्हासनगर (Ulhasnagar) मधील हिल लाईन पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षकांच्या कक्षात कल्याणचे शिवसेना प्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर गोळीबार केला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये गणपत गायकवाड हे महेश गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांसोबत पोलिस ठाण्यात बसलेले दिसत आहेत. (हेही वाचा - Thane BJP MLA Shootout Case: 'महाराष्ट्रात गँगवॉर, भाजपला सत्तेची मस्ती', आमदार गोळीबार प्रकरणावरुन सुप्रिया सुळे आक्रमक)
व्हिडिओमध्ये गणपत गायकवाड अचानक उठून पिस्तूल काढत महेश गायकवाड आणि त्याच्या साथीदारांवर गोळ्या झाडताना दिसत आहेत. गोळीबार सुरू होताच, महेश आणि त्याचे साथीदार बाहेरच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न करतात. काही क्षणातच पोलिस अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून गणपतला आवरले आणि वाद शमवला. (हेही वाचा -Sanjay Raut On Ulhasnagar Firing: उल्हासनगर गोळीबारासाठी एकनाथ शिंदे जबाबदार; संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाना)
गोळीबार केल्याप्रकरणी भाजप आमदाराला अटक -
ठाणे जिल्ह्यातील जमिनीच्या वादातून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या नेत्यावर गोळीबार करून जखमी केल्याप्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यापूर्वी एका वृत्तवाहिनीशी फोनवर बोलताना गणपत गायकवाड म्हणाले की, आपल्या मुलाला पोलीस ठाण्यात मारहाण होत असल्याने आपण बंदुकीचा वापर केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रात ‘गुन्हेगारांचे साम्राज्य’ स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप गणपत गायकवाड यांनी केला आहे. (हेही वाचा - Kalyan Firing: माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर पोलिस ठाण्यात गोळीबार, उल्हासनगरमध्ये खळबळ)
पहा व्हिडिओ -
#WATCH | CCTV footage of Hill Line police station in #Ulhasnagar shows #BJP MLA #GanpatGaikwad firing shots at #ShivSena leader #MaheshGaikwad and his supporters. 2 people were injured in this incident, while the BJP legislator was held. pic.twitter.com/1wdjQknCRK
— Free Press Journal (@fpjindia) February 3, 2024
दरम्यान, महेश गायकवाड यांना ठाणे शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, ती यशस्वी झाली, असे शिवसेनेचे कल्याण प्रभारी गोपाळ लांडगे यांनी सांगितले आहे.