| (Photo Credits: Twitter/ANI)

Washim News: महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील सुपुत्राला देशसेवा करत असताना वीरमरण आल्याची  माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे जिल्यात मोठी शोककळा पसरली आहे. आकाश आढागळे (वय वर्षे 31) असे या वीरमरण आलेल्या जवानाचे नाव आहे. आकाश भारतीय सैन्यात गेल्या ११ वर्षांपासून कार्यरत होते. काल 10 सप्टेंबर रोजी एका दुर्घटनेत दुखापत झाली. गंभीर अवस्थेत असताना त्याना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आणि काही वेळाने त्यांचा मृत्यू झाला. भारतीय सैनात देखील मोठी शोककला पसरली आहे.

आकाश हे शिरपूर गावातील रहिवाशी होते. या घटनेनंतर शिरपूर गावासह जिल्ह्यात मोठी शोककळा पसरली आहे. काश्मीर येथील लेह परिसरात त्यांची पोस्टींग होती.त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी रुपाली आढागळे, 4 वर्षांची मुलगी, आई विमलबाई आढागळे आणि दोन भाऊ नितीन आढागळे आणि उमेश आढागळे असा परिवार आहे. तीन ही भावंड देश सेवेत कार्यरत होते.

लेह मध्ये ८सप्टेंबरला कार्यरत असताना त्याचा अपघात झाला. त्याना सैन्यदलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमी झाल्याने त्याचा रुग्णालयातच वीरमरण आले. २०११ रोजी ते भारतीय सैन्यदलात भरती झाले. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उद्या त्यांच्या राहत्या शिरपूर मध्ये अंत्यविधी करण्यात येईल. परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.