वर्धा मध्ये अंधश्रद्धेतून अघोरी प्रकार; 80 कोटींचा पाऊस पाडण्याचं सांगत मुलीचा निर्वस्त्र करुन छळ
Images For Representation | Image Use For Symbolic Purposes Only | (Photo Credits: PixaBay)

महाराष्ट्रातील (Maharashtra) वर्धा (Wardha) येथे अंधश्रद्धेतून एक अघोरी प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. तब्बल 80 कोटींचा पाऊस पाडणार असे सांगत एका युवतीचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला आहे. या अघोरी पूजेसाठी युवतीला निर्वस्त्र करुन तिच्यासोबत घृणास्पद प्रकार करण्यात आले. काही महिन्यांपासून सुरु असलेल्या त्रासाला कंटाळून पीडित युवती घरातून निघून गेली. या प्रकरणी बाळू मंगरूटकर आणि पीडितेच्या नातलगाला अटक करण्यात आली आहे. (Lohardaga Crime: अंधश्रद्धेचा कळस! मुलाच्या हव्यासापोटी एका व्यक्तीने चक्क पोटच्या मुलीचा दिला बळी; लोहरदगा येथील धक्कादायक घटना)

विशेष म्हणजे या सर्व प्रकारला पीडितीच्या आईने देखील पाठिंबा दर्शवला. युवतीची आई एका दुकानात काम करते. तिथे तिची एका महिलेशी ओळख झाली. या महिलेने मुलीची पूजा करुन पैशांचा पाऊस पाडणाऱ्या मांत्रिकाविषयी सांगितलं. तिच्या बोलण्यातून येऊन तिनेही पैसे मिळवण्यासाठी मांत्रिकाचा मार्ग निवडला. (पुणे: आजारी व्यक्तीवर केलेल्या काळ्या जादूवर उपाय म्हणून दोन भोंदूबाबांनी 4 कबुतरांच्या बदल्यात उकळले 6 लाख रूपये)

युवतीच्या शरीरात मुंजा म्हणजेच अतृप्त आत्मा सोडून  पैशाचा पाऊस पाडण्याचं आमिष मांत्रिकाने दाखवलं. यात कुटुंबातील व्यक्तीही सहभागी झाल्या. हा प्रकार करताना कुवारा पेपर, विधवा पेपर, डीआर असे कोड बोलले जात होते. तसंच या अघोरी पूजेसाठी युवतीला वर्धा लगतच्या जिल्ह्यांत नेण्यात आलं होतं. दरम्यान, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती देखील पोलिसांच्या मदतीला धावून आली. यापूर्वी हव्यासातून अंद्धश्रद्धेला बळी पडल्यामुळे अघोरी प्रकार घडल्याचे समोर आले आहे.