Lohardaga Crime: अंधश्रद्धेचा कळस! मुलाच्या हव्यासापोटी एका व्यक्तीने चक्क पोटच्या मुलीचा दिला बळी; लोहरदगा येथील धक्कादायक घटना
मुलाच्या हव्यासापोटी एका व्यक्तीचे चक्क आपल्या पोटच्या मुलीचा बळी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. ही धक्कादायक घटना झारखंडच्या (Jharkhand) लोहरदगा (Lohardaga) जिल्ह्यात घडली आहे.
मुलाच्या हव्यासापोटी एका व्यक्तीचे चक्क आपल्या पोटच्या मुलीचा बळी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. ही धक्कादायक घटना झारखंडच्या (Jharkhand) लोहरदगा (Lohardaga) जिल्ह्यात घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील चौकशीला सुरुवात केली. आरोपी हा रोजीरोटीसाठी दुसऱ्या राज्यात गेले असताना एका भगतने त्याला पुत्रप्राप्तीसाठी आपल्या मुलीचा बळी देण्याचा सल्ला दिला होता. तसेच अंधश्रद्धा पसरवणारा कोणत्या गावातून आला आहे, याची माहिती मिळाली नसून स्थानिक पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
सुमन नागेसिया (वय, 26) असे आरोपीचे नाव असून तो लोहरदगा जिल्ह्यातली बोंडोबार गावातील रहिवाशी आहे. सुमन अशिक्षित असून रोजीरोटीसाठी दुसऱ्या राज्यात गेला होता. तिथे सुमनची एका भगतसोबत ओळख झाली. दरम्यान, त्यांच्यात पुत्रप्राप्तीबाबत चर्चा झाली. त्यावेळी आपल्या सहा वर्षाची मुलगी असून मुलासाठी काय करावे लागेल? असा प्रश्न सुमनने त्या भगतला विचारला. पुत्रप्राप्तीसाठी तुला तुझ्या मुलीची बळी द्यावा लागेल, असे उत्तर भगतने सुमन दिले. त्यानंतर सुमनने भगतला घरी बोलावून पूजाअर्चा केली आणि अंगणात आपल्या मुलीचा बळी दिला. आपल्या मुलीचा बळी दिल्यानंतर सुमनच्या पत्नी रडून बेहाल झाली आहे. हे देखील वाचा- Bihar Assembly Elections 2020: भोजपुर हादरले! बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पूर्वसंध्येला भाजप महिला मोर्चाच्या नगराध्यक्षाच्या पतीची गोळ्या झाडून हत्या
नक्षलग्रस्त आणि कडाग्रस्त भाग असल्याने ग्रामस्थांनी सुमनला जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 55 किमी अंतरावर असलेल्या किस्को ब्लॉक मुख्यालयात आणले. त्यानंतर पेशारार पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याला लोहरदगा मंडळाच्या तुरुंगात पाठवले आहे. सुमनची पत्नी भीतीपोटी सिकरगड, पाखर येथे आपल्या गावी गेली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Nov 14, 2020 09:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

