वर्धेत (Wardha) 7 वर्षीय चिमुकलीबरोबर माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. चिमुकली असो अल्पवयीन वा स्त्री, अखेर महिला कुठेही आणि कुणा बरोबरही सुरक्षित नाहीत याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. वर्ध्यातील स्वतच्या आजोबानंच अवघ्या 7 वर्षाच्या नातीवर लैगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. या घटनेनं संतापाची लाट उसळली आहे. पीडित चिमुकलीच्या आईनं यासंदर्भात रामनगर पोलिसांत (Ram Nagar Police Station) तक्रार दाखल केली आहे. आरोपीनं स्वतःच्या मुलीच्या मुलीवर अत्याचार केला असून याप्रसंगी पीडित चिमुकलीच्या आजोबांना अटक करण्यात आली आहे. तरी रामनगर पोलिस या प्रकरणात पुढील कारवाई करीत आहेत.
नराधन आजोबा चार दिवसांपासून सतत चिमुकलीवर अत्याचार करत आहे. पीडित चिमुकलीची आई आणि आजी घराच्या किचनमध्ये (Kitchen) काम करत होती. एवढ्यात चिमुकलीची आजी कामासाठी बाहेरच्या खोलीत आली. त्यानंतर तिनं जे पाहिलं ते पाहून आजी जोरात ओरडली. आजीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून हातातील काम टाकून चिमुकलीची आई बाहेर आली. त्यावेळी धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर आई आणि आजीनं चिमुकलीची विचारपूस केली आणि चिमुकलीच्या आईने चिमुकलीसह थेट पोलिस स्थानक गाठलं. संबंधीत प्रकाराबाबत पोलिसांना माहिती देत चिमुकलीच्या आईने स्वतच्या वडिलांविरोधात तक्रार नोंदवली. (हे ही वाचा:- Nagpur Crime: पाय लागल्याचे निमित्त, तरुणाला धावत्या ट्रेनमधून फेकले; नागपूर येथील घटना)
रामनगर पोलिसांनी या प्रकरणावर कारवाई करत चिमुकलीच्या आजोबास म्हणजे आरोपी नराधमास अटक केली आहे. आरोपी विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. आजोबांनी आपल्या नातीवरच अत्याचार केल्याच्या घटनेनं संपूर्ण परिसर हादरला आहे. परिसरातील नागरिकांकडून संतापाची लाट उसळली आहे. पिडीत चिमुकलचं वय फक्त ७ वर्ष असल्याने तिच्या बरोबर नेमके काय अत्याचार झाले हे तिला नीट सांगताही आले नाहीत.तरी तिच्या बरोबर गेल्या चार दिवसांपासून आजोब असं कृत्य करत असल्याची माहिती चिमुकलीने दिली आहे.