
Pune Crime News: पुण्यात ऐन दिवाळीत डीमार्टमध्ये दोन महिलांचे पर्स चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील कर्वेनगर येथील डीमार्ट येथून महिलांचे पाकिट चोरी झाले आहे. त्यामुळे या डीमार्टमध्ये बराच वेळ गोंधळ उडाला. डीमार्टमध्ये दिवाळीची खरेदी करण्यासाठी आलेल्या महिलांसोबत हा किस्सा घडला आहे. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. महिलांनी या घटनेनंतर संताप व्यक्त केला आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कर्वेनगर येथील रहिवासी तृप्ती वाळूंजकर या मुलीसोबत खरेदी साठी आल्या होत्या. रात्री साडेनऊच्या दरम्यान खरेदी आल्या होत्या. पाकिट त्यांनी पिशवीमध्ये ठेवले होते. पिशवी डीमार्टच्या कर्मचाऱ्यांकडून बंद करून घेतली होती. आतमध्ये खरेदी करत असताना ट्रॉलीमधून पिशवी चोरट्यांने चोरली. या घटनेची माहिती डीमार्टच्या कर्मचाऱ्यांना सांगण्यात आली. तात्काळ वारजे पोलिस ठाण्यात या घटनेची माहिती देताच, पोलिस कर्मचारी डीमार्टमध्ये दाखल झाले.
पोलिसांनी सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासले त्यानंतर संबंधित तक्रार पोलिसांनी ऑनलाईन दाखल करून घेतली. दुसरी महिला मोनिक परदेशी यांची देखील पर्स चोरी झाल्याचे समजले. या बाबत डीमार्टच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, प्रतिक्रिया देऊ शकत नाही असी माहिती दिली. या घटनेनंतर महिलांनी संताप व्यक्त केला. डीमार्ट सारखा ठिकाणी चोरी होत असल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली.