मुंबईत गेल्या काही दिवसांपासून चिघळलेला वाडिया रुग्णालयाचा प्रश्न अखेर निकाली लागला आहे. मनसे अध्यक्ष शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) आणि काही मनसे पदाधिका-यांच्या मध्यस्थीमुळे हा प्रश्नावर तोडगा निघाला आहे. 14 जानेवारीला संध्याकाळी शर्मिला ठाकरे आणि मनसे पदाधिका-यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister) यांच्यासोबत चर्चा झाली. या चर्चेत वाडिया रुग्णालयाबाबत सकारात्मक निर्णय झाला. ज्यात येत्या 2 दिवसात राज्य सरकारकडून 50% थकबाकी रुग्णालयाला देण्यात येईल असे सांगण्यात आले.
वाडिया रुग्णालयाला राज्य सरकारचे 16-17 सालापासून थकीत बाकी होते. यामुळे वाडिया रुग्णालय बंद होण्याच्या मार्गावर होते. मात्र मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे मंगळवारी संध्याकाळी मनसे पदाधिका-यांसह महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. ज्यात
राज्य सरकारचे 16-17 सालचे थकीत पन्नास टक्के 24 कोटी दोन दिवसात दिले जातील असे उपमुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले. तसेच महापालिकेने 22 कोटी देण्याचे मान्य केले आहे आजपासून वाडियातील सेवा सुरळीत सुरू होतील. अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत असेही त्यांनी सांगितले. मुंबई: राज्य सरकार आणि महापालिकेकडून येणारा निधी थकल्याने वाडिया रुग्णालय बंद होण्याच्या वाटेवर
तसेच दुसरीकडे वाडिया रुग्णालयाबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत वाडियातील अनियमिततेबाबत समिती नेमून चौकशी केली जाईल. रुग्णालयातील खाटा वाढवल्या कोणत्याही परवानगीशिवाय. जो करार झालाय त्यात बदल केला जाईल अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
शुक्रवारपासून वाडिया रुग्णालयातील रुग्णांना घरी पाठवण्याचं काम हॉस्पिटल प्रशासनाकडून करण्यात येत होतं. अत्यावश्यक औषधे घ्यायला आमच्याकडे पैसे नाही हे कारण सांगत 300 बालक आणि 100 महिला रुग्णांना परत पाठवल्याची माहिती वाडिया रुग्णालय ट्रस्टच्या सीईओ मिनी बोधनवाला यांनी दिली होती.