मुंबई च्या वडाळा भागामध्ये 3 वर्षीय बाळाच्या किडनॅपिंग प्रकरणी तरूणीसह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपीचा बाळाला 2 लाख मध्ये विकण्याचा सौदा झाला होता. महिला आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये तिला 10 वर्षाखालील कोणत्याही अल्पवयीन बालकाला हाती देण्यासाठी 2 लाख रूपये कबूल करण्यात आले होते. कर्ज फेडण्यासाठी बाळ देण्याचा निर्णय घेणारी ही तरूणी कॉलेजमध्ये शिकत होती. मित्रांच्या मदतीने तिने पैशाला भुलून हा व्यवहार केला होता.
लोकमतच्या वृत्तानुसार, वडाळा भागात 27 वर्षीय सुमन चौरसिया राहत होती. तिचा 3 वर्षीय मुलगा सोमवारी घराबाहेर खेळत होता. दुपारच्या वेळेस खेळता खेळता अचानक तो गायब झाला. चौरसिया यांनी आजुबाजूला शोध घेतला. मात्र काहीच थांगपत्ता न लागल्याने पोलिस स्टेशन गाठलं आणि तक्रार नोंदवली. नंतर पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फूटेज मध्ये तक्रारदारांच्या शेजारी राहणार्या सानिका वाघमारे यांच्यासोबत मुलगा जाताना दिसला. Kalyan News: रेल्वे स्टेशनहून चार वर्षाच्या मुलाचं अपहरण, कल्याण पोलीसांनी आठ तासांतच मुलाचा घेतला शोध .
पोलिस तपासामध्ये सानिकाची चौकशी झाली तेव्हा तिच्या ओळखीचा पवन पोखरकर या 20 वर्षीय तरूणाने तिला लहान मुलाच्या बदल्यात 2 लाख मिळतील असं सांगितलं होतं. त्यानुसार पवन सोबत सानिका टॅक्सीने कल्याणला गेली. मात्र संबंधित व्यक्तींशी संपर्क न झाल्याने डाव फसला. कटात सहभागी असलेल्या पवन आणि सार्थक बोंबले यांना पोलिसांनी मंगळवारी सकाळी अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
शकील शेख (19 ) व साईनाथ कांबळे (24) हे हरवलेल्या चिमुकलेल्या घेऊन पोलिस ठाण्यात आले. सानिकाने या दोघांना मुलाचा ताबा देताना हा वाटेत सापडल्याचं पोलिसांना सांगायचं असं समोर आलं आहे.
विद्याविहारच्या एका नामंकित कॉलेजमध्ये सानिका आणि पवन हे एफवायबीएससी च्या वर्गात आहेत.