Vinayak Mete (Photo Credits: FB)

शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे (Vinayak Mete)  मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला येत असताना 14 ऑगस्ट दिवशी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे (Mumbai Pune Expressway) वर भीषण अपघातामध्ये मृत्यूमुखी पडले. या अपघात प्रकरणी आता त्यांच्या कारचा चालक एकनाथ कदम विरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. CID कडून रसायनी पोलीस स्टेशनमध्ये (Rasayani Police Station) कलम 304(2) नुसार या गुन्ह्याची नोंद झाली आहे. विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूचा तपास सीआयडी कडे सोपावण्यात आला होता.

पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर मेटेंची गाडी ज्या मार्गांवरून गेली तेथील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले आहेत. या व्हिडिओ फूटेजमधून नक्की कोणाची होती? याचा तपास करण्यात आला. त्यामध्ये IRB चे इंजिनिअर्स, रोड इंजिनिअर्स यांची टेक्निकल टीम एकत्र होती. हे देखील नक्की वाचा:  Devendra Fadnavis On Vinayak Mete Accident: चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक केल्याने विनायक मेटेंचा अपघात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान सभेत निवेदन.

सीआयडीच्या तपासामध्ये गाडी 120-140 ताशी वेगाने चालत होती. मेटेंचा चालक गाडी उजव्या बाजूला घेऊन ओव्हर टेक करण्याचा प्रयत्न करत होता. पण त्यासाठी पुरेशी जागा नव्हती सोबतच पुढे एक गाडी जात असूनही चालकाने हा प्रकार केल्यामुळे गाडीच्या डाव्या बाजूला धक्का बसल्याचं समोर आलं आहे. या भीषण अपघातामध्ये मेटे यांचा रूग्णालयात जाण्यापूर्वीच मृत्यू झाला.

विनायक मेटे यांच्या चालकावर गुन्हा दाखल झाल्याने आता काही तासांतच त्याला अटक होणार आहे. त्याला किमान 2 वर्ष तुरूंगवास ते कठोर शिक्षा होऊ शकते.

एकनाथ शिंदे यांनी मेटेंच्या अपघाताची माहिती मिळताच हॉस्पिटलमध्ये भेट देऊन घडल्या प्रकाराची माहिती घेत अपघात आणि मृत्यू प्रकरणी सीआयडी चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.