मुंबई (Mumbai) मध्ये विक्रोळी (Vikhroli) भागात पूर्व द्रुतगती मार्गावर एक मोठा अपघात झाला आहे. रतरी 12.30 च्या सुमारास हा अपघात झाला असून भरधाव वेगातील कारवरील नियंत्रण सुटल्याने गाडी फूटपाथवरील झाडाला आदळली आणि काही अंतरावर जाऊन पलटली असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान यामध्ये 2 जण ठार झाले असून या अपघातामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
विक्रोळी हाय वे वर हॉटेल प्रविण समोर रात्री 12.30च्या सुमारास हा कार अपघात झाला आहे. यामध्ये चालक सिद्धार्थ ढगे आणि त्याच्या बाजूला बसलेला त्याचा मित्र रोहित निकम गंभीर स्वरूपात जखमी झाले होते. त्यांना राजावाडी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले मात्र तो पर्यंत उशिर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. नक्की वाचा: Mumbai Road Accidents: मुंबईत यंदा जानेवारी ते जुलै दरम्यान रस्ते अपघातात 164 जणांचा मृत्यू; वाहतूक पोलिसांच्या आकडेवारीत समोर आली माहिती.
मागील काही दिवसामध्ये रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी हिट अॅन्ड रन केस च्या घटना देखील समोर आल्या आहेत. दरम्यान ड्रिंक अॅन्ड ड्राईव्ह रोखण्यासाठी देखील सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. कडक नियमावली करत हे अपघात रोखण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.