Instagram Reel | (Photo credit: archived, edited, representative image)

Mumbai Crime News: रील्स बनविणे आणि त्यासाठी वाट्टेल ते करणे आजकाल सर्ऱ्हास होऊ लागले आहे. खास करुन तरुणाई यामध्ये अधिकच अडकली आहे. त्यामुळे अपघातासोबतच आर्थिक नुकसान होण्याचे प्रमाणही वाढले आहे. मुंबई येथील विक्रोळी (Vikhroli Crime) परिसरात इन्स्टाग्राम रिल्स (Instagram Theft) बनविण्यासाठी चित्रिकरण करणाऱ्या एका महिलेला असाच धक्कादायक अनुभव आला. तिचा आयफोन (iPhone 13) चोरीस (iPhone Snatching Mumbai) गेला. सदर महिला तिच्या धाकट्या बहिणीसबत रील व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी हातातून हिसकावत आयोफोन 13 चोरुन (iPhone 13 Theft) नेला. ही घटना 1 मे रोजी रात्री 8.30 च्या सुमारास 21 वर्षीय महिलेसोबत नारायण बोधे पुलाजवळ घडली.

चोरांचा काळ्या रंगाच्या दुचाकीवरुन पोबारा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही बहिणी इन्स्टाग्राम रिल्स व्हिडिओ शूट करण्यासाठी टागोर नगरमधील परेश पार्कर मार्केट येथून जवळच्या सर्व्हिस रोडवर चालत गेल्या होत्या. पीडितेने तिचा अ‍ॅपल आयफोन 13 तिच्या धाकट्या बहिणीला दिला होता, जी कॅमेरा चालवण्यास मदत करत होती. शूट दरम्यान, 20 ते 23 वयोगटातील एक अज्ञात व्यक्ती शांतपणे आला आणि तिच्या बहिणीच्या हातातून फोन वेगाने हिसकावून घेतला. त्यानंतर तो त्याच्या साथीदार चालवत असलेल्या काळ्या मोटारसायकलवर उडी मारुन बसला आणि दोघेही प्रवीण बोगदा जवळील उत्तरेकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडचा वापर करून मुंबईच्या दिशेने वेगाने निघाले. लोकमत टाईम्सच्या वृत्ताचा दाखला देत फ्रीप्रेस जर्नलने याबाबत वृत्त दिले आहे. (हेही वाचा, Bull Rides Scooter: बैलाने चालवली स्कूटर; घटना CCTV मध्ये कैद, Rishikesh येथील Video व्हायरल)

आयफोन 13 ची झालेली चोरी आणि अचानक घडलेला प्रसंग यामुळे गर्भगळीत झालेल्या महिलेने घाबरुन, ताबडतोब तिच्या वडिलांना माहिती दिली आणि विक्रोळी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. संबंधित कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला. चोरीला गेलेला फोन - आयफोन 13- सुमारे 20,000 रुपये इतक्या किमतीचा होता.

पीडितांकडून संशयित आरोपींचे वर्णन

तक्रारदाराने दोन्ही संशयितांची तपशीलवार माहिती दिली. फोन पकडणारा माणूस काळसर रंगाचा असल्याचे सांगितले जात आहे, त्याने आडव्या पट्ट्यांसह पांढरा शर्ट आणि निळा जीन्स घातला होती. दुचाकीस्वार सुमारे 5 फूट 7 इंच उंच होता, पूर्णपणे काळा कपडे घातलेला होता आणि तो 20 ते 25 वर्षांच्या दरम्यान दिसत होता. पीडितेने पोलिसांना सांगितले की जर तिने पुन्हा दोन्ही संशयितांना पाहिले तर ती त्यांना ओळखू शकेल.

दरम्यान, संशयितांच्या हालचाली शोधण्यासाठी विक्रोळी पोलिस सध्या जवळच्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. चोरीमध्ये वापरलेल्या काळ्या मोटारसायकलचा शोध घेण्यासाठी आणि जबाबदार असलेल्यांची ओळख पटविण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे सार्वजनिक ठिकाणी व्हिडिओ शूट करणाऱ्या तरुणी आणि सोशल मीडिया कंटेंट निर्मात्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता निर्माण झाली आहे. पोलिसांनी रहिवाशांना सतर्क राहण्याचे आणि कोणत्याही संशयास्पद हालचालींची त्वरित तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.