शिवसेनेमधून (Shivsena) एकनाथ शिंदेंसोबत (Eknath Shinde) 50 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर माजी नगरसेवक, पदाधिकारी यांनी देखील बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. त्यांच्यापैकी काहींवर पक्ष विरोधी कारवाई केल्याचा ठपका लावत त्यांची हकालपट्टी देखील झाली आहे. या मध्ये आता शिवसेनेचे पुरंदर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांचा देखील समावेश आहे. त्यांची देखील पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. सोबतच त्यांचे शिवसेना सभासद सदस्यत्त्व देखील रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान विजय शिवतारे यांनी गुरूपौर्णिमेला भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्याचे फोटोदेखील सोशल मीडीयामध्ये शेअर करण्यात आले. या फोटोनंतर आता त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. गुरूपौर्णिमेला त्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली नव्हती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांनी खास शुभेच्छा देण्यासाठी पोस्ट केली होती. त्यांची भेट घेण्यात आली होती. Political Guru Purnima In Maharashtra: महाराष्ट्रात राजकीय गुरुपौर्णिमा, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळाला शिवसेना नेत्यांची भेट, आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापले.
उपमुख्यमंत्री मा.ना. @Dev_Fadnavis यांची आज गुरुपोर्णिमेनिमित्त भेट घेत शुभेच्छा दिल्या. pic.twitter.com/ZF41vlE8Y4
— Vijay Shivtare (@vijayshivtare) July 13, 2022
पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. यामधील पुरंदर मध्ये 2009,2014 साली झालेल्या निवडणूकीत विजय मिळवला होता. 2014 च्या निवडणूकीनंतर राज्यात भाजप-शिवसेना युतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांच्यावर राज्यमंत्रिपदाची जबाबदारीही देण्यात आली होती. पण 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसच्या संजय जगताप यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
शिवसेनेमधून यापूर्वी नरेश मस्के, संतोष बांगर, तानाजी सावंत यांची हाकलपटटी झाली आहे. सदा सरवणकर यांनी आपल्या पदाधिकार्यांसह शिवसेनेतील सार्या पदांचा राजीनामा दिला आहे. आनंद अडसूळ यांचाही त्यामध्ये समावेश आहे.