परळी आणि केज येथे राष्ट्रवादीचा आमदार निवडून येत नाही तोपर्यंत बीड मध्ये फेटा बांधणार नाही- खा. अमोल कोल्हे
खासदार अमोल कोल्हे (फोटो सौजन्य-Facebook)

राष्ट्रवादी पक्षाचे (NCP) खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांची बीड (Beed) मध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. याच पार्श्वभुमीवर परळी (Parli) आणि केज (Kej) येथे राष्ट्रवादी पक्षाचा आमदार निवडून येत नाही तोपर्यंत बीड जिल्ह्यात आल्यावर फेटा बांधणार नाही असा निर्धार केला आहे. अमोल कोल्हे सध्या शिवस्वराज्या यात्रेच्या माध्यमातून राज्यातील विविध ठिकाणी भेट देत आहेत.

परळी येथून आंबाजोगाई येथे अमोल कोल्हे यांची यात्रा आली होती. ही यात्रा विधानसभा निवडणूकीपूर्वी घेण्यात आली आहे. तर अंबाजोगाई येथे त्यांनी भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी नमिता मुंदडा यांनी कोल्हे यांना फेटा त्यांना बांधण्यासाठी घेतला. मात्र फेटा बांधून घेण्यास त्यांनी नकार देत मोठे विधान केले. यावर कोल्हे यांनी असे म्हटले की, जोपर्यंत नमिता मुंदडा या केज विधानसभा मतदारसंघ आणि धनंजय मुंडे हे परळी विधानसभा मतदारसंघातून विजयी होत नाही तो पर्यंत बीड मध्ये फेटा घालणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.(महापुरामुळे थांबलेली राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा 19 ऑगस्टपासून सुरु; खा. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार महाराष्ट्र दौरा)

तसेच सध्या केज आणि परळी विधानसभा मतदारसंघात भाजपची सत्ता आहे. तर 2014 मधील विधानसभा निवडणूक पंकजा मुंडे यांनी भाऊ धनंजय मुंडे यांचा पराभव केला होता. त्याचसोबत संगीता ठोंबरे यांनी नमिता मुंदडा यांचा पराभव केला होता. परंतु आता येत्या विधानसभेत या दोन्ही जागा राष्ट्रवादीच्या असतील यासाठी जोरदार प्रयत्न केले जाणार असल्याचे ही कोल्हे यांनी म्हटले आहे.