मराठी सिनेसृष्टीतील जेष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू (Shreeram Lagoo) 92 व्या वर्षी मंगळवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. यामुळे मराठी सिनेसृष्टीत शोककळा पसरली असून त्यांच्या निधनाचे दुख व्यक्त केले जात आहे. श्रीराम लागू यांनी मराठी चित्रपटासह नाटकात फार मोठे योगदान दिले आहे.लागू यांचा अभिनय नेहमीच मराठी रंगभूमीत तगडा राहिला आहे.
याच पार्श्वभुमीवर राजकीय नेते मंडळींनी सुद्धा श्रीराम लागू यांच्या निधनाचे दुख व्यक्त करत ट्वीट केले आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही लागू यांच्या निधनानंतर ट्वीट करत असे म्हटले आहे की, माणसाने कसं अर्थपूर्ण जगायला हवं ह्याचं चिंतन डॉ.लागू ह्यांनी आयुष्यभर केलं आणि त्यातील सामोरं आलेलं वास्तव अप्रतिम पद्धतीने अभिनयातून मांडलं. खऱ्या अर्थाने डॉ. श्रीराम लागू हे ‘सूर्य पाहिलेला माणूस’.आज त्यांचं निधन झालं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनम्र श्रद्धांजली.(ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन; मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टीचे चालतेबोलते विद्यापीठ हरपले)
राज ठाकरे ट्वीट:
माणसाने कसं अर्थपूर्ण जगायला हवं ह्याचं चिंतन डॉ.लागू ह्यांनी आयुष्यभर केलं आणि त्यातील सामोरं आलेलं वास्तव अप्रतिम पद्धतीने अभिनयातून मांडलं. खऱ्या अर्थाने डॉ. श्रीराम लागू हे ‘सूर्य पाहिलेला माणूस’.आज त्यांचं निधन झालं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनम्र श्रद्धांजली.
— Raj Thackeray (@RajThackeray) December 18, 2019
ज्येष्ठ अभिनेते Dr.Shreeram Lagoo यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन
श्रीराम लागू यांचा सातारा येथे 16 नोव्हेंबर 1927 रोजी जन्म झाला. तर, 1979 मध्ये लागू यांनी आपल्या अभिनयास सुरुवात केली. डॉ. श्रीराम लागू म्हणजे मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टी यांचे एक चालतेबोलते विद्यापीठच होते. त्यांच्या जाण्यामूळे मराठी चित्रपटसृष्टी आणि मराठी रंगभूमी यांचे मोठे नुकसान झाल्याची भावना अनेक कलाकार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केली आहे.