वीर सावरकर- नथुराम गोडसे समलैंगिक संबंधांचा दावा करणे गैरच! काँग्रेसने पुस्तिका रद्द करावी: नवाब मलिक
Nawab Malik (Photo Credits: Twitter)

वीर सावरकर (Veer Savarkar) - नथुराम गोडसे (Nathuram Godse) यांच्यात समलैंगिक संबंध असल्याचा दावा करणाऱ्या काँग्रेसच्या पुस्तिकेवरून देशभरात एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. महाराष्ट्रात देखील यावरून भाजप (BJP)- शिवसेना (Shivsena)  यांच्यात पुन्हा एकदा खडाजंगी सुरु झाली असून सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर (Ranjeet Savarkar) यांनी काल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे हे पुस्तक रद्द करून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासहित काँग्रेस सेवा दल (Congress Seva Dal) अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या वादात प्रतिक्रिया देताना आज राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP)  नेते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी चक्क काँग्रेसच्या भूमिकेच्या विरुद्ध विधान केले आहे. तुमच्यात वैचारिक भेद असू शकतात मात्र कोणाचीही मानहानी करणे आणि ते सुद्धा ती व्यक्ती म्हणजेच सावरकर हयात नसताना असे फोल दावे करणे गैर आहे असे मलिक यांनी म्हंटले. तसेच हे पुस्तक रद्द करण्यात यावे अशीही सूचना वजा मागणी त्यांनी केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, काँग्रेस तर्फे वाटण्यात आलेल्या पुस्तिकांमध्ये ब्रह्मचर्य ग्रहण करण्याआधी नथुराम गोडसे आणि सावरकर यांच्यात समलैंगिक संबंध असल्याचा दावा करण्यात आला आहे. सावरकर 12 वर्षांचे असताना त्यांनी एका मशिदीवर दगड भिरकावले असल्याचेही या पुस्तिकेत करण्यात आला आहे. वाचा सविस्तर

ANI ट्विट

दरम्यान, या विधानावर प्रतिक्रिया देताना, भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला होता, महाराष्ट्र धर्माच्या पालनात जर सावरकर येत असतील? तर तातडीने सावरकरांची बदनामी करणाऱ्या काँग्रेसच्या पुस्तिकेवर महाराष्ट्रात बंदी घाला. मराठी बाणा दिसू द्या! असे शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आवाहन केले होते तर, याबाबत संजय राऊत यांनी "सावरकर हे महान होते आणि काही विचारसरणीचे लोक त्यांच्याबाबत वाईट बोलत आहेत पण तो केवळ त्यांच्या विचारांचा प्रश्न आहे" असे उत्तर दिले होती.