नवी मुंबई: NHAI कडून टोल वसुली सुरु झाल्यानंतर वाशी टोल प्लाझावर गाड्यांच्या लांबच लांब रांगा (See Pics)
Vashi Toll Plaza (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र राज्य 25 मार्च पासून लॉकडाऊन करण्यात आलं होतं. त्यामुळे सर्व प्रकारची वाहतूक, व्यवहार ठप्प होते. मात्र कोरोना रुग्णांची सातत्याने वाढती संख्या पाहता लॉकडाऊनचा कालावधीही वाढवण्यात आला. मात्र वस्तू-मालांची राज्यांतर्गत आणि आंतरराज्यीक वाहतूक आजपासून सुरु करण्यात आली. त्यानंर राष्ट्रीय महामार्गांवर टोल वसुलीला सुरुवात झाली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) आणि महामार्ग विकसकांनी यांच्याकडून महामार्गांवर टोलवसूली केली जात आहे. गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार, कोरोना व्हायरस दहशतीच्या पार्श्वभूमीवर 25 मार्चपासून लॉकडाऊन असल्यामुळे टोल वसुली बंद होती. (महाराष्ट्र: NHAI च्या वतीने आजपासून राष्ट्रीय महामार्गांवरील टोलवसुली सुरु)

लॉकडाऊनचा पहिला टप्पा संपताच 15 एप्रिलपासून टोलवसुलीला सुरुवात करण्यात येणार होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनचा कालावधी वाढवल्याने टोलवसुली स्थगित करण्यात आली. दरम्यान वाहतूक, टोलवसुलीसह लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात कोरोनाचे हॉटस्पॉट नसलेल्या ठिकाणी काही उद्योगधंदे, व्यवसाय सुरु करण्यास सूट देण्यात आली आहे.

ANI Tweet:

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मार्च महिन्याच्या सुरुवातीला टोल प्लाझावरील टोल वसुली तात्पुरती स्थगित करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आपत्कालीन सेवांमध्ये होणारी गैरसोय कमी होण्यास आणि वेळेची बचत होण्यास मदत होईल, असे गडकरी म्हणाले होते.