महाराष्ट्र: NHAI च्या वतीने आजपासून राष्ट्रीय महामार्गांवरील टोलवसुली सुरु
National Highway (Photo Credits: ANI)

भारताचा कोरोना विरोधातील लढा तीव्र असून त्या पार्श्वभूमीवर 3 मे देशभरात लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे. मात्र यामुळे भारताचे अर्थव्यवस्था कोलमडू नये यासाठी 20 एप्रिलपासून केंद्रीय सरकारने एक नवीन नियमावली काढली आहे. त्यानुसार, काही उद्योगधंदे, ऑफिसेस आजपासून सुरु करण्यात येणार आहे. याचाच अर्थ आजपासून काही अंशी लोक घराबाहेर पडतील. यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने आजपासून राष्ट्रीय महामार्गांवरील (National Highway) टोलवसुली सुरु करण्यात आली आहे. यासंदर्भातील मुंबईतील वाशी टोलनाक्यावरील काही फोटोज आज ANI वृत्तसंस्थेने दाखविली आहेत.

20 एप्रिलपासून सरकारने नॉन-बँकिंग आर्थिक संस्था, हाउसिंग फायनान्स, लहान आर्थिक संस्थांना बंद दरम्यान कमीत कमी कर्मचाऱ्यांसोबत काम करण्याची परवानगी दिली आहे. सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वात असे म्हटले आहे की, 50 टक्के कर्मचाऱ्यांसह ऑफिस सुरु करु शकतात.गृहमंत्रालयाच्या नव्या दिशा-निर्देशकांनुसार, इमारतीसाठी वापरले जाणार लाकूड सोडून जंगलातील वने, अन्य वनउत्पादन जमा करण्यासाठी आदिवासी आणि वनवासियांना सूट दिली जाणार आहे. बांबू, नारळ, सुपारी, कोको, मसाल्यांची शेती, त्यांची कापणी, पॅकेजिंग, विक्री आणि मार्केटिंगसाठी सुद्धा लॉकडाउन मधून वगळण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर वाशी टोल नाका आणि नागपूरातील बोरखेडी टोलनाक्यावर टोलवसुली सुरु करण्यात आली आहे.

बोरखेडी टोलनाका:

हेदेखील वाचा- गृह मंत्रालयाकडून लॉकडाउनसाठी नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर, 'या' कामांसाठी मिळणार परवानगी

वाशी टोलनाका:

दरम्यान, महाराष्ट्रात आज 552 नवीन कोरोना व्हायरस केसेस आणि 12 मृत्यूची नोंद झाली आहे. यासह एकूण सकारात्मक घटनांची संख्या 4200 वर पोहचली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 223 मृत्यूची नोंद झाली असून, 507 रुग्ण बरे होऊन त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. भारतात परदेशी नागरिकांसह कोरोना विषाणूच्या साथीच्या आजाराची लागण झालेल्या लोकांची, संख्या 16,116 झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली.