पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे हे नेहमीच कोणत्यांना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. मनसे नेते वसंत मोरे यांनी मंगळवारी एक पोस्ट करुन उघडपणे नाराजी बोलून दाखवली आहे. त्यांनी फेसबुकवर पोस्ट करत, एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस शांत होतो.. असं म्हणत त्यांनी भावनां व्यक्त केल्या आहेत. लोकसभा निवडणुकांसाठी दोन-तीन दिवसांमध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यातच वसंत मोरे यांच्या पोस्टमुळे मनसे पक्षातली अंतर्गत गटबाजी उघड झाली आहे. आपल्याला कुणाकडूनही अपेक्षा नाहीत, असं म्हणत वसंत मोरे यांनी खेद व्यक्त केला आहे. (हेही वाचा - वसंत मोरे यांनी आज घेतली सुप्रिया सुळे, शरद पवार यांची भेट; पहा भेटीमागील कारण काय?)
मागच्या काही वर्षांपासून वसंत मोरे यांची नाराजी लपून राहिलेली नाही. काही वेळा जाहीरपणे, काहीवेळा अंतर्गत तर कित्येकदा सोशल मीडियातून त्यांची नाराजी उघड झालेली आहे. एवढं सगळं होऊनही त्यांनी राज ठाकरे यांची साथ कधी सोडलेली नाही. राज ठाकरे यांनी देखील त्यांची नाराजी दुर करण्याचा प्रयत्न केला होता.
वसंत मोरे यांची फेसबुक पोस्ट
''एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो...
त्यानंतर ना कोणाकडे तक्रार कतो, ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो...''
अशी पोस्ट मनसे नेते वसंत मोरे यांनी केली आहे. त्यांची ही पोस्ट व्हायरल झाली आहे.
काही दिवसापुर्वीच वसंत मोरे यांनी आज पुण्यात सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांची भेट घेतली होती. काही दिवसांवर लोकसभा निवडणूकांच्या तारखा जाहीर होण्याचं चिन्ह असताना लोकसभेसाठी उत्सुक असलेले वसंत मोरे काही मतांची जुळवाजूळव करत आहेत का? असा प्रश्न विचारला जात आहे.