पुण्याचे मनसे (MNS ) नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांनी अखेर 'शिवतीर्थ' (Shivtirth ) येथे जाऊन पक्षाध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. या भेटीमध्ये (Vasant More meet Raj Thackeray) दोन्ही नेत्यांमध्ये सवीस्तर चर्चा झाली. राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथील सभेत बोलताना मशिदींवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेवरुन मोरे नाराज होते. तर, मोरे यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केल्यामुळे राज ठाकरे त्यांच्यावर नाराज होते. असे एकमेकांबद्दल नाराज असलेले दोन्ही नेते एकमेकांना भेटले. दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या भूमिका समजून घेऊन परस्परांमध्ये 'फिल गूड' वातावरण निर्माण केले.
'शिवतीर्थ'वरुन बाहेर पडल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना वसंत मोरे यांनी सांगितले की, राज ठाकरे यांच्याशी विविध विषयांवर स्पष्ट चर्चा झाली. यात मशिदींवरील भोंग्याबद्दलही चर्चा झाली. राज ठाकरे यांनी मला म्हटले की, तुला माज्यापर्यंतचा थेट अॅक्सेस असताना तू माझ्याशी का नाही बोललास? यावर मी सांगितले की, आपण भूमिका जाहीर केली आणि रमजानचा महिना असल्याने मला कार्यकर्त्यांचे फोन येऊ लागले. आपण असे काही करणार आहात का? त्यातच प्रसारमाध्यमांनीही मला विचारले त्यामुळे मला जाहीर बोलावे लागले. (हेही वाचा, Raosaheb Danve Meets Raj Thackeray: केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवेंनी घेतली राज ठाकरेंची भेट, 'या' मुद्यांवर झाली चर्चा)
ट्विट
मी माझ्या साहेबांसोबत...
आयुष्यात संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजयोग येत नाही...!
जय श्रीराम pic.twitter.com/4eAfvgf5wx
— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) April 11, 2022
आपल्याला सर्व पक्षांकडून ऑफर आल्या होत्या. परंतू, राज ठाकरे यांच्याशी भेटल्यानंतर त्या सर्व ऑपर तेथेच संपल्या आहेत. काही लोकांमुळे काही प्रश्न निर्माण झाले होते. मात्र, ते आता संपृष्टात आले आहेत, असेही मोरे यांनी म्हटले आहे. जाहीर नाराजी व्यक्त केल्यानंतर वसंत मोरे यांना पुणे जिल्हा शहराध्यक्ष पदावरुन हटविण्यात आले होते. त्यांची पदावरुन हकालपट्टी करण्यात आली होती. त्यामुळे वसंत मोरे पक्ष सोडणार अशी चर्चा होती. त्यांना विविध राजकीय पक्षांकडूनही ऑफर होती. मात्र, सर्वांना वेटींग लिस्टवर ठेऊन वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेण्यास प्राधान्य दिले. या भेटीनंतर सर्व ऑफर त्यांनी धुडकावून लावल्या होत्या.