
Vasai Crime: वसईत (Vasai) प्रवासी लॉजमध्ये चप्पल आणि बॅग ठेवण्यावरून एका गायकाची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात वसई येथील माणिकपूर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याला अटक (Arrest) केली आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. राजेश शहा असे आरोपीचे नाव आहे. धारदार हत्याराने आरोपीने गायक राधाकृष्ण व्यंकटरमन यांच्या छातीत वार केला.काल त्यांच्यात मोठा वाद झाल्याने हत्या केल्याचे समोर आले.
मिळालेल्या माहितीनुसार, काल वसईत एका प्रवाशी लॉज मध्ये हत्या झाली. आरोपी आणि मडत व्यक्ती हे दोघेही वसई येथील एका प्रवाशी लॉज मध्ये गेल्या काही दिवसांपासून राहत होते. आरोपी चार वर्षांपासून तेथे राहत असल्याची माहिती मिळाली. काल दुपारी त्यांच्या चप्पल आणि बॅग ठेवण्यावरून वाद झाला. हा वाद खूप मोठा वाढत गेला. रागाच्या भरात राजेशने चाकूने राधाकृष्ण याच्या छातीत वार केला.
छातीत चाकू रुतुन बसला. चाकू बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता,पंरतु तो निघाला नाही. अखेर लॉजच्या व्यवस्थापकाला ही घटना कळल्यावर त्याने जखमीला खासगी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटने अंतर्गत माणिकपूर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांनी दिली आहे.