Vasai Accident: मुंबईतील वसई पूर्व येथे एका ६ वर्षाच्या चिमुरड्याला कॅब चालकाने चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने मूल वाचले आणि त्याला किरकोळ दुखापत झाली. मिळालेल्या माहितीनुसार, औद्योगिक परिसरातील नयापाडा गावात ही घटना घडली असून, त्याचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. फुटेजमध्ये दिसत आहे की, लहान मूल कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ बसले असताना एका कारने त्याला धडक दिली. गाडीचे मागील चाक त्याच्या अंगावरून गेले. आश्चर्याची बाब म्हणजे गाडीचा चालक आणि प्रवाशाने ना गाडी थांबवली ना तिचा वेग कमी केला. ते कार घेऊन पळून गेले. या अपघातामुळे मूल भयंकर घाबरले होते, पण ते जिवंत होते.
वसईत 6 वर्षाच्या मुलाला कॅबने चिरडले
Accident: A six-year-old boy, playing in an industrial area in #Vasai, was critically injured after being accidentally run over by an aggregated cab on Wednesday.
Note: Ignore a few last seconds of the videohttps://t.co/R3QzQL9ZyI pic.twitter.com/HPAKkzdXWS
— Diwakar Sharma (@DiwakarSharmaa) December 25, 2024
अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
इतर दोन मुलांच्या मदतीने त्याला रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून चालकाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेने पुन्हा एकदा रस्ता सुरक्षा आणि वाहनचालकांच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
असे दिसते की अनेकवेळा वाहनचालक त्यांच्या निष्काळजीपणामुळे केवळ स्वतःचाच नाही तर इतरांचाही जीव धोक्यात घालतात. पोलीस प्रशासनाकडून लवकरच आरोपींची ओळख पटवून त्याला कठोर शिक्षा होईल, जेणेकरून भविष्यात अशा घटनांना आळा बसेल, अशी अपेक्षा आहे.