Vasai: वसई येथील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून त्यामागील कारण ऐकल्यास तुमचे दृदय ही पिळवटले जाईल. कारण मुलाची अपेक्षा असताना पुन्हा एकदा मुलगी झाली म्हणून जन्मदात्या आईनेच चिमुकलीचा जीव घेतल्याची घटना घडली आहे. तर सदर महिलेने 2 महिन्याच्या चिमुकलीला पाण्याच्या टाकीत बुडवून तिची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी महिलेला अटक करण्यात आली असून तिच्या विरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Vasai: भुईगाव बीचजवळ समुद्रात तरंगताना दिसली कार; मालकाचा शोध सुरु Watch Video)
वसई मधील पाचूबंदर येथील सदर महिला राहते. तर त्यांचा मासे सुकवण्याचा व्यवसाय असून बुधवारी जुळ्या बहिणींपैकी एक जण बेपत्ता झाली. त्यामुळे मुलगी कुठे हरवली याचा शोध घेण्यास सुरुवात केली. सर्वत्र शोधले पण कुठे भेटली नाही. त्यामुळे घराच्या छतावर शोध घेण्यास पुन्हा सुरुवात केली त्यावेळी जे लोकांनी पाहिले त्यावर कोणाचा विश्वासच बसला नाही. कारण मुलगी छतावर असलेल्या पाण्याच्या टाकीत आढळून आल्याने सर्वांनाच धक्का बसला. तातडीने मुलीला रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.(Ulhasnagar Murder: कामाचे पैसे मागायला आला म्हणून मालकाकडून मजुराची हत्या; उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल)
या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु केला. त्यावेळी मुलीच्या आईनेच तिने आपल्या चिमुकलीची हत्या केल्याचे पोलिसांसमोर कबुल केले. तर महिलेला आधीच दोन मुली होत्या. त्यानंतर ही तिला पाचवे मुल ही मुलगी झाली. परंतु महिलेला मुलगा हवा होता. याच कारणास्तव तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.