Airlines | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुले लॉकडाउनचे आदेश पुढील काही दिवस कायम राहमार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. परंतु लॉकडाउनमुळे परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणले जात आहे. त्यासाठी वंदे भारत मिशन (Vande Bharat Mission ) सुरु करण्यात आले असून भारतीयांना भारतात हळूहळू आणले जात आहे. तर आता एकूण 17 विमानांमधून राज्यातील 2423 जणांना मुंबईत आणण्यात आले आहे. यापैकी 900 जण हे मुंबईतील आहेत. तर 1139 जण राज्यातील विविध ठिकाणी राहणारे आहेत.

मुंबईत परदेशातून आलेल्या नागरिकांना विविध 43 हॉलेटमध्ये करण्यात आले आहे. तसेच क्वारंटाइन केल्यानंतर नियमांचे कठोर पालन करण्यात येत असल्याचे माहिती देण्यात आली आहे. क्वारंटाइनच्या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेचे 50 अधिकारी आणि कर्मचारी पथ स्थापन करण्यात आले आहे. राज्य सरकारकडून सुद्धा 15 कर्मचाऱ्यांचे पथक स्थापन करण्यात आले आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांना त्यांच्या डिल्ह्यात आणि राज्यात पाठवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.येत्या काळात जोहान्सबर्ग, जकार्ता, लंडन, मनीला, टोकिओ, कोलम्बो, मॉरिशस, नैरोबी या ठिकाणाहून भारतात आणले जाणार आहे.(मुंबईसह राज्यात 25 मेपासून देशांर्गत विमानसेवा पुन्हा सुरू करण्याबाबत पहा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काय दिले संकेत)

कोविड 19 च्या गंभीर परिस्थितीत रिक्षा, बस आणि टॅक्सी सेवा सुरु करणे धोकादायक ठरु शकते, असेही गृहमंत्री म्हणाले. विमान प्रवासामुळे कोरोना बाधितांच्या संख्येत भर पडल्यास रेड झोनवरील ताण अधिक वाढेल, हा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. तर महाराष्ट्रातील तीन महत्त्वाची आणि आंतरराष्ट्रीय विमानतळे मुंबई, पुणे आणि नागपूर येथे असून ही तिन्ही ठिकाणं रेड झोन मध्ये येत आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या सर्वाधिक असल्यामुळे अशा परिस्थितीत विमानसेवा सुरु करणे योग्य ठरणार नाही. या व्यतिरिक्त काही छोटी विमानतळे नाशिक, शिर्डी, नांदेड या ठिकाणी असून ही ठिकाणे देखील रेड झोन अंतर्गत आहेत.