(कोकण विभागाचे पदविधर आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना वामनराव खोत. सोबत उपस्थित मान्यवर )

मुंबई: श्री देवी शांतादुर्ग हायस्कुलचे हरहुन्नरी शिक्षक वामनराव खोत यांना 'वसंत स्मृती' आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य विधानपरीषदेचे माजी सभापती दिवंगत वसंतराव डावखरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा पुरस्कार दिला जातो. सुरु असलेल्या वर्षापासूनच (2018) हा पुरस्कार दिला जात असल्याने या पुरस्काराचे यंदाचे पहिलेच वर्ष होते. त्यामुळे या पुरस्काराच्या प्रथम वर्षाचा मानखरी ठरण्याचा मान खोत यांना मिळाला आहे.

कोकण विभागाचे पदविधर आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. ठाणे येथील टीपटॉप प्लाझा येथे हा सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला औदुंबर भागवत, वामनराव खोत, संभाजी नलगे, चंद्रकांत काटे, गवस सर, राणे सर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. कोकण आणि प्रामुख्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात शालेय शिक्षणासोबत पर्यावरण क्षेत्रात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल वामनराव खोत यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पुरस्काराबाबत बोलताना वामनराव खोत म्हणाले, 'आपल्याला ज्ञानदानासोबतच समाजकार्य आणि पर्यावरण आदी विषयांत काम करण्याची आवड सुरुवातीपासून आहे. अशा पुरस्कारांमुळे आपल्या कार्याला समाजाकडून पोचपावती मिळते. या पुरस्कारामुळे यापुढेही शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रात जोमाने काम करण्याचे बळ मिळेल.

पुढे बोलताना खोत म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात असलेल्या कुरुंदवाडी (झरे) या गावातून आपल्या संघर्षाला सुरुवात झाली. मुळातच दुष्काळी असेलेल्या या प्रदेशामुळे संघर्षाशी नाते जोडले गेले. तसेच, संघर्ष आणि अपयषावर मात करण्याचे बळही मिळाले. या बळामुळेच शिक्षकी पेशात कार्यरत असताना विविध प्रश्नांवर सकारात्मक दृष्ठीने विचार करुन मार्ग काढता आला. विविध उपक्रम राबवतानाही त्याचा फायदा झाला. पर्यावरणासंदर्भात काम करताना देशभरात विविध ठिकाणी प्रशिक्षणसाठीही जावे लागल्याचे खोत यांनी या सांगितले.