राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेलेल्या वैभव पिचड यांचा पराभव तर उदयनराजे भोसले पिछाडीवर, पक्ष सोडल्याचा मोठा फटका बसल्याची चिन्हे
Vaibhav Pichad and Udayanraje Bhosle (Photo Credits: Facebook/IANS)

विधानसभा निवडणुकीचे निकाल आता अंतिम टप्प्यात आले असताना आतापर्यंत हाती आलेल्या मतमोजणी फेरीत राजकारणाचे संपुर्ण चित्र बदलून गेले आहे. महायुतीची सत्ता जरी येणार असली तर हा विजय अपेक्षेप्रमाणे नसल्याचे चित्र दिसत आहे. दुस-या पक्षातून आलेले दिग्गज नेते भाजपचे विधानसभा निवडणुकीचे चित्र बदलून टाकेल असे वाटत होते मात्र तसे काहीच घडले नाही. याउलट अन्य पक्षातून आलेले दिग्गज नेत्यांपैकी काही नेत्यांचा दणदणीत पराभव झाला तर काही जण पिछाडीवर आहेत. यात मधुकर पिचड यांचे चिरंजीव वैभव पिचड (Vaibhav Pichad) यांचा दणदणीत झाला राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. किरण लहामटे (Dr.Kiran Lahamate) विजयी झाले आहेत. तर साता-याचे उदयनराजे भोसले हे देखील पिछाडीवर असून त्यांची विजयाकडे आगेकूच करणे त्यांना अशक्य झाले आहे.

अकोले मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. किरण लहामटे यांनी पिचड यांच्या बालेकिल्ल्यात 1 लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला. हा वैभव पिचडांसाठी मोठा धक्का आहे असे म्हणायला हरकत नाही. तर दुसरीकडे साता-यात भाजपाकडून उभे राहिलेले उदयनराजे भोसले देखील पिछाडीवर आहेत. त्यांनी राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी उदयनराजे यांच्यावर टिका केली होती. सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीतर्फे अखेर श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती.

हेही वाचा- शरद पवारांवर ED ची कारवाई आणि अमित शाह यांचे व्यक्तिगत हल्ले BJP ला पडले भारी?

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या निवडणुकीत नेत्यांची बरीच अदलाबदली झाली. त्यात वैभव पिचड आणि उदयनराजे भोसले यांचे पक्षांतर हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा आघात होता.

अकोले मतदारसंघात वैभव पिचड यांचे माजी मंत्री मधुकर पिचड सातवेळा या मतदारसंघातून आमदार झाले होते. तर उदयनराजे भोसले लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या तीनच महिन्यात त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. भाजपनं दिल्लीत मोठा इव्हेंट घडवून उदयनराजे यांचा भाजप प्रवेश सोहळा घडवून आणला होता. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उदयनराजे यांच्यासाठी साताऱ्यात सभा घेतली होती. मात्र, या कशाचाही फायदा उदयन यांना झाला नसल्याचं दिसत आहे. ते पिछाडीवर गेले आहेत.

मात्र शरद पवारांचे झालेले शेवटचे भाषण तसेच पवारांना दिलेला धोका जनतेला रुचला नसावा. त्याचाच परिणाम हा या निवडणुकीत पाहायला मिळाला. सध्या तरी उदयनराजे भोसले यांच्या निकालाचा कल पराभवाकडेच झुकतो आहे. जनमताचा कौल कुणाकडे झुकतो हे काही वेळातच कळेल.