Vaccination For College Students: राज्य सरकारकडून आता कॉलेज मधील विद्यार्थ्यांसाठी खास लसीकरण सेवा सुरु केली जाणार आहे. त्यासाठी त्याला मिशन युवा स्वस्थ अभियान असे नाव दिले आहे. हे अभियान आरोग्य विभाग-उच्च आणि तंत्रज्ञान विभागाकडून 25 ऑक्टोंबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान चालवले जाणार आहे. म्हणजेच दिवाळीपूर्वी हे स्पेशल लसीकरण पार पाडले जाणार आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी असे म्हटले की, विभागाअंतर्गत 5 हजार महाविद्यालये आहेत. त्यामध्ये पॉलिटेक्निक्स,आयटी, प्रोफोशनल्स कॉलेज आणि अन्य शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे.त्यानुसार 18 वर्षाचे 40 लाख विद्यार्थ्यांची संख्या असल्याचे टोपे यांनी म्हटले.
पुढे टोपे यांनी असे म्हटले की, लसीकरण न झालेल्या विद्यार्थ्यांची एक लिस्ट तयार करण्यास आम्ही मुख्याध्यापकांना सांगितले आहे. त्यानुसार आरोग्य विभागाकडून लसीचे डोस विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केले जातील. यापू्वी सुद्धा अशा पद्धतीचे स्पेशल लसीकरण करण्यात आले होते. त्यासाठी मिशन कवच कुंडल असे नाव दिले होते. यामध्ये दसऱ्यापूर्वी 15 लाख नागरिकांचे प्रतिदिनी लसीकरण केले गेले.(Adulterated Food: सणासुदीच्या दिवसांमध्ये भेसळयुक्त मिठाई व इतर अन्न पदार्थ विकल्यास होणार कारवाई; दुध व दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ तपासणी वाढवण्याचे निर्देश)
मिशन युवा स्वस्थ अभियानात ड्रॉपआउट विद्यार्थ्यांना सुद्धा सहभागी होता येणार आहे. टाइम्स ऑफ इंडिया सोबत बोलताना टोपे यांनी म्हटले की, मुख्यमंत्र्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देणार असून याबद्दल अंतिम निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. पूर्ण लसीकरण झाले नसेल तर विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळणार नाही आहे.