Sardhana Gang Rape Case: शाळेतून परतणाऱ्या मुलीचे अपहरण करुन सामूहिक बलात्कार, पीडितेची आत्महत्या; Sardhana येथील घटना
Image used for representational purpose | (Photo Credits: File Image)

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील मेरठ येथील सरधना (Sardhana) परिसरात एका मुलीवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) केल्याची घटना पुढे येत आहे. इयत्ता 10 वीत शिकत असलेली पीडिता शाळेतून परतत असताना चार आरोपींनी तिचे अपहरण करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार (Sardhana Gang Rape Case) केला असा आरोप आहे. या घटनेनंतर पीडितेने घरी परतल्यावर विष प्राशन केले. तिला रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेबाबत पोलिसांना काल (शुक्रवार, 2 मार्च) माहिती मिळाली.

या घटनेबाब माहिती देताना एसपी देहात केशव कुमार यांनी सांगितले की, ही घटना गुरुवारी (1 मार्च 2021) घडली. चार युवक या घटनेत आरोपी आहेत. पीडितेच्या घरुन आत्महत्येबाबतची चिठ्ठी मिळाली आहे. यात लखन पूत्र संजय, विकास पूत्र बलवंत आणि मुरली आदी आरोपींचा उल्लेख केला आहे. कुमार यांनी सांगितले की, पीडितेच्या चिठ्ठीवरुन पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. इतरांचा तपास सुरु आहे. (हेही वाचा, Dadra and Nagar Haveli: 4 वर्षांच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न व नंतर गळा चिरून हत्या; आघात सहन न झाल्याने पीडितेच्या वडिलांची आत्महत्या)

पोलिसांनी पुढे बोलताना सांगितले की, बलात्काराची घटना घडल्यानंतर पीडिता कशीबशी घरी पोहोचली आणि तिने या घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यानंतर तिला विषारी पदार्थ खायला दिल्याची प्राथमिक माहिती आहे. पीडितेला सायंकाळी 6.30 च्या सुमारास मोदीपूरम येथील एसडीएस ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्या, तिचा मृत्यू झाला. प्रकरणाचा तपास सुरु आहे. लवकरच आरोपींना पकडले जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.