#UPDATE मुंबई: चर्नी रोड येथे रहिवाशी इमारतीला भीषण आग; नागरिकांची सुखरूप सुटका
Fire Broke At Charni Road (Photo Credits: ANI)

दक्षिण मुंबईतील (South Mumbai) चर्नी रोड (Charni Road) परिसरात आज सकाळी ड्रीमलँड सिनेमाजवळ (DreamLand Cinema) आदित्य आर्केड (Aaditya Arcade) या निवासी इमारतीला भीषण आग (Fire) लागली. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्याला सुरुवात केली आहे. आगीची माहिती मिळताच सर्वात आधी रहिवाश्यांना बाहेर काढण्यात आले मात्र तरी इमारतीत आठ जण अडकून पडले होते. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून नुकतेच या नागरिकांची सुखरूप सुटका केली आहे. अद्याप याठिकाणी बचावकार्य सुरु आहे

प्राप्त माहितीनुसार, ही आज लेव्हल-3 स्वरूपाची होती,मात्र आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सकाळी 7 वाजताच्या सुमारास या परिसरातून धुराचे लोट उसळताना पाहायला मिळत होते.

ANI ट्विट

दरम्यान, मागील काही काळात दक्षिण मुंबईतील अनेक इमारतींच्या बाबतीत दुर्घटना सातत्याने समोर येत आहेत. काही ठिकाणी बिल्डींग कोसळून तर कुठे अशा प्रकारच्या आगीमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होता. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र यामुळे इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.